Sunday, June 20, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी पूरपरिस्थितीचे नियोजन : प्रशासनाकडून कृती आराखडा तयार

पूरपरिस्थितीचे नियोजन : प्रशासनाकडून कृती आराखडा तयार

Related Story

- Advertisement -

मागील वर्षी झालेली अतिवृष्टी व आलेला महापूराचा जिल्हा प्रशासनाने केला. यंदाही पुर परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून आपत्ती निवारणासाठीचा कृती आराखडा तयार केला आहे.

कोरोना परिस्थिती हाताळत असतांना आता पुर परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. आपत्ती निवारण कायद्यानुसार प्रत्येक जिल्हयाला पावसाळयाच्या पार्श्वभुमीवर आपत्ती निवारण कृती आराखडा तयार करावा लागतो. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली असून तला लघुकृती आराखडा तयार करून जबाबदार्‍या निश्चित केल्या आहेत. यात पाटबंधारे विभाग, महापालिका, पोलीस आयुक्तालय, ग्रामीण पोलीस अधिक्षक, जिल्हा परिषद, निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य यंत्रणा, महावितरण, दूरसंचार विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, राज्य परिवहन महामंडळ, रेल्वे आदी विभागांचा समावेश करण्यात आला आहे.

- Advertisement -

आपत्तीची सूचना मिळताच या विभागांना आपल्या कार्यक्षेत्रात करावयाच्या उपाययोजना, सूचना, प्रतिबंधात्मक उपाय यासाठी सतर्क राहावे लागते. यासाठी प्रत्येक अधिकार्‍यांकडे जबाबदारी निश्चित करून समन्वय आणि संपर्क राखून जिल्हा आपत्ती कक्षाकडे माहिती पुरविण्याची महत्वाची भूमिका देण्यात आली आहे.

मागील वर्षी गेल्या अनेक वर्षांतील अत्यंत मोठा पुर येऊन देखील शून्य मनुष्य हानी आणि कमीत कमी मालमत्तेचे नुकसान झाले. त्यामध्ये पूर्व नियोजनाचा बहुमोल वाटा होता.विस्तृत कृती आराखड्याची अंमलबजावणी करताना नेमकी कोणती कामे कोणी व कोणत्या क्रमाने करावीत यामध्ये ऐनवेळी संभ्रम निर्माण झाल्यास परिस्थिती हाताळणी अडचणी उद्भवतात. हा विचार करून आपल्या नाशिक जिल्ह्याने एक विशेष कल्पना मागील वर्षी राबवली ती म्हणजे लघुकृती आराखडा तयार केला गेला आणि त्याचा खूप उपयोगही झाला. यावर्षी देखीलआराखडा अद्ययावत करून लागू करण्यात आला आहे.
– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

- Advertisement -