घरमहाराष्ट्रकर्जतमधील नद्यांना महापूर; 100 हुन अधिक गावांचा संपर्क तुटला

कर्जतमधील नद्यांना महापूर; 100 हुन अधिक गावांचा संपर्क तुटला

Subscribe

अनेक पूल, रस्ते पाण्याखाली, अनेक गावांमध्ये शिरले पाणी; सर्वत्र भीतीचे वातावरण

कर्जत तालुक्यातील नद्यांनी रुद्र रूप धारण केले असून सतत कोसळणार्‍या धुवाधार पावसामुळे अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. उल्हासनदी, चिल्हारनदी आणि पोशीर नदींना पूर आला असून अनेक रस्ते, पूल पाण्याखाली गेले आहेत. अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.

यावर्षी सतत तीन वेळा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. उल्हास नदीवरील दविवली पूल तिसर्‍या वेळेस पाण्याखाली गेला आहे, तसेच धोमोते, वंजारपाडा, पोही, अवसरे, तळवडे, कशेळे आदी रस्त्यावरून पाणी गेल्याने अनेक रस्त्यांवरील वाहतूक बंद झाली आहे. सर्व रस्ते पूल पाण्याखाली आल्याने सुमारे 100 हुन अधिक गावांचा संपूर्ण तुटला आहे, तसेच या महापुरामुळे अनेक रस्ते खचल्याने वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. अनेक ठिकाणी नाल्या वाहून गेल्या आहेत तर शेतीचे बांध फुटून आणि रस्ते खचून, लावलेली शेती वाहून जाऊन अनेक शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

तसेच बांधकाम व्यवसायिकांच्या मनमानी कारभारामुळे कधी न जाणार्‍या रस्त्यांवरून देखील पाणी गेले आहे. तसेच काही गावांमध्ये पाणी शिरले आहे. बिरदोले गावात पाणी शिरून जिल्हा परिषद शाळेत वर्ग खोल्यांमध्ये पाणी शिरले आहे. नेरळ-शेलू दरम्यान रेल्वे ट्रक खचले आहेत. नेरळ कळंब रस्त्यावरील माले पूल सुमारे 10 मीटरपर्यंत खचला आहे. तसेच नेरळ-कोल्हारे रस्ता देखील खचल्याने या रास्तावरून वाहतूक बंद आहे. एकूणच पावसाने सर्वत्र दाणादाण उडवली आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. परंतु जे रस्ते खचले आहेत त्या रस्त्यावर वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

उल्हास नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने कोल्हारे, बिरदोले, हंबरपाडा, बामचामळा आदी गावांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एकूणच पावसाने रस्ते, पूल, वाहने, ट्रेन अशा अनेक साधनांचा मार्ग बंद आहे. त्यामुळे कुठे किती नुकसान झाले आहे, हे पाऊस आणि पूर ओसरल्यावर कळेल हे नक्की, अशा पुरात सर्वांनी सावधगिरी बाळगावी आहे आवाहन करण्यात येत आहे..

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -