घरताज्या घडामोडीशिंदे सरकारने १६४ मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला, विरोधात महाविकास आघाडीची ९९ मते

शिंदे सरकारने १६४ मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला, विरोधात महाविकास आघाडीची ९९ मते

Subscribe

भाजपचे ज्येष्ठ आमदार माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी शिंदे सरकारच्या बहुमताचा प्रस्ताव विधानसभेत मांडला.

शिवसेनेच्या बंडखोर गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या विश्वासदर्शक ठराव जिंकला. २८७ आमदारांपैकी १६४ मते शिंदे सरकार मिळाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने बहुमत चाचणी जिंकली. भाजपचे ज्येष्ठ आमदार माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी शिंदे सरकारच्या बहुमताचा प्रस्ताव विधानसभेत मांडला. सरकारच्या विरोधात ९९ जणांची मतदान केले. दरम्यान, विधानसभेच्या बहुमत चाचणीत आज २० आमदार गैरहजर होते. (The Shinde government won the confidence vote, getting a majority of 164 votes in the test)

हेही वाचा

- Advertisement -

सपाचे आबू आझमी आणि रइस शेख हे बहुमत चाचणीच्या वेळी तटस्थ राहिले. तर एमआयएमचे फारूख अन्वर हे सदस्य तटस्थ राहिले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुरुंगात असल्याने ते बहुमत चाचणीला उपस्थित नव्हते. दरम्यान, सोमवारी सकाळी ११ वाजता सुरु झालेल्या बहुमत चाचणीच्या अधिवेशनाला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह किमान चार आमदार अनुपस्थितीत होते. त्यामुळे तेही बहुमत चाचणीला मुकले.

हेही वाचा – गुजरातसोबतच महाराष्ट्राच्या मध्यावधी निवडणुका होतील, संजय राऊतांचा दावा

- Advertisement -

रविवारपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले जालना जिल्ह्यातील आमदार संतोष  बांगर हे सोमवारी सकाळी एकनाथ शिंदे गटात सामिल झाल्याने शिवसेनेतून फुटून वेगळा गट स्थापन करणाऱ्या आमदारांची संख्या ४० झाली आहे. रविवारी झालेल्या विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना १६४ तर, राजन साळवी यांना १०७ मते पडली. तर, तीन आमदार तटस्थ राहिले होते. शिवसेनेच्या ४० आमदारांनी शिंदे सरकारच्या बाजूने मतदान केलं तर उर्वरित १५ आमदारांनी प्रस्तावाविरोधात मतदान केले.

हेही वाचा – ठाकरेंना आणखी एक धक्का, आमदार संतोष बांगर शिंदे गटात सामिल

आज आठ मते कमी पडली

विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी काल विरोधीपक्षाकडे १०७ मते होती. पण आज विश्वासदर्शक ठरावात विरोधीपक्षाची ८ मते कमी पडली. आज विरोधी पक्ष ९९ वर थांबला. अशोक चव्हाण यांच्यासह विजय वडेट्टीवार, संग्राम जगातप, अण्णा बनसोडे हे विधानसभा सदस्य ११ वाजल्यानंतर विधिमंडळ परिसरात आल्याने लेटलतिफ आमदार विधानसभेत पोहोचू शकले नाहीत.

काँग्रेसचे हे आमदार होते अनुपस्थित

  • अशोक चव्हाण
  • प्रणिती शिंदे
  • जितेश अंतापुरकर
  • विजय वडेट्टीवार
  • झिशांत सिद्दीकी
  • धिरज देशमुख
  • कुणाल पाटील
  • राजू आवळे
  • मोहन हंबर्डे
  • शिरीष चौधरी
Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -