Mumbai Beutify Project : माटुंगा उड्डाणपूल झाला प्रेक्षणीय, पिलर्सवर अवतरला हल्क

मुंबईतील उड्डाणपूलं आणि पादचारी पुलांखाली रंगरंगोटी करून आकर्षक लूक देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे मुंबईतील काही उड्डाणपूलं प्रेक्षणीय स्थळ झाली आहेत. माटुंगा येथील उड्डाणपूलांच्या पिलर्सवर पक्षी, निसर्ग, धबधबे, फुलं आणि हल्क यांसारख्या कार्टूनचं चित्र रेखाटण्यात आलं आहे. या पिलर्सची रंगरंगोटी केल्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी ते आकर्षक असं स्थान वाटत आहे.