Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र पुण्यात डिलिव्हरी बॉयचा प्रताप; रस्त्यातच तरुणीचे चुंबन घेण्याचा प्रयत्न

पुण्यात डिलिव्हरी बॉयचा प्रताप; रस्त्यातच तरुणीचे चुंबन घेण्याचा प्रयत्न

पिंपरी चिंचवडमधील वाकड भागातील घटना, स्वीगी डिलिव्हरी बॉयविरुद्ध पोलिसांनी केला गुन्हा दाखल

Related Story

- Advertisement -

मुंबईतील बलात्काराच्या घटनेमुळे संपूर्ण राज्यभरात खळबळ उडालेली असतानाच, पुण्यातील पिंपरी चिंचवडमधून विनयभंगाची धक्कादायक घटना पुढे आलीय. या ठिकाणच्या वाकड परिसरात एका स्विगी फूड डिलिव्हरी बॉयने भररस्त्यात तरुणीला ओढत किस करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी वाकड पोलिसांनी त्या व्यक्तिविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी रस्त्यावर जात असताना, अचानक आलेल्या अज्ञात फूड डिलिव्हरी बॉयने जवळ येऊन अश्लिल शेरेबाजी सुरू केली. त्यानंतर लगेचच तिचा हात पकडून तिला ओढले आणि मिठी मारुन तिला किस करण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

फूड डिलिव्हरी बॉयचं वय अंदाजे २० ते २५ वर्षे असावं, असं सांगितलं जातंय. हा प्रकार घडताच तरुणीने डिलीव्हरी बॉयविरुद्ध तक्रार केली आहे. त्यावरून पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय. पोलीस डिलिव्हरी बॉयचा शोध घेताहेत.

- Advertisement -