घरताज्या घडामोडीमहिला दिनी किळसवाणा प्रकार; डिलीव्हरी बॉय तिच्यासमोर चैन उघडून उभा राहिला

महिला दिनी किळसवाणा प्रकार; डिलीव्हरी बॉय तिच्यासमोर चैन उघडून उभा राहिला

Subscribe

जगभरात आज जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. महिला पुरुषाच्या एक पाऊल पुढे जाऊन काम करत असल्याचे मेसेज सोशल मीडियावर पडतायत. मात्र तरिही स्त्री ही वस्तूच असल्याची पुरुषप्रधान मानसिकता आजही अनेक प्रसंगातून दिसून येत आहे. पुण्यात शुक्रवारी घडलेल्या एका किळसवाणा प्रकार ऐकून तुमच्या तळपायाची आग मस्तकात गेल्या शिवाय राहणार नाही. पुण्यात एका फुड डिलीव्हरी करणाऱ्या मुलाने डिलीव्हरी दिल्यानंतर २१ वर्षीय मुलीसमोर आपल्या पँटची चैन उघडली. या भयानक प्रकारानंतर मुलीने तक्रार केली असून पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “पुण्यातील मुलीने ऑनलाईन साईटवरुन जेवणाची ऑर्डर दिली होती. शुक्रवारी रात्री १० वाजता जेवण पोहोचवणारा आरोपी मुलगा जेवण घेऊन आला. त्यानंतर त्याने मुलीकडे पिण्यासाठी पाणी द्या, अशी विनंती केली. जेव्हा तरुणी पाणी घेऊन आली, तोवर आरोपीने आपल्या पँटची चैन उघडून आक्षेपार्ह हालचाल केली.”

- Advertisement -

हे वाचा – चप्पल शिवता शिवता झाली ‘बॅग बिजनेस वुमन’

डिलीव्हरी बॉयच्या या धक्कादायक वर्तनानंतर घाबरलेल्या तरुणीने सदर कंपनीच्या कस्टमर केअरला फोन करुन तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला तिथून उत्तर मिळाले नाही. त्यानंतर तरुणीने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पाच लोकांवर गुन्हा दाखल केला असून पुढचा तपास सुरु केला आहे.

- Advertisement -

 


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -