घरमहाराष्ट्रमुरुडमध्ये फूड फेस्टिव्हलची धूम!

मुरुडमध्ये फूड फेस्टिव्हलची धूम!

Subscribe

तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या येथील पर्यटन महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनारी आयोजिलेल्या फूड फेस्टिव्हलचे उद्घाटन बुधवारी नगराध्यक्षा स्नेहा पाटील आणि उपनगराध्यक्षा नौसिन दरोगे यांच्या हस्ते करण्यात आले. देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या पर्यटन महोत्सवाची वातावरण निर्मिती या फूड फेस्टिव्हलमुळे दणक्यात होते. यावेळी विविध चविष्ट खाद्यपदार्थ आणि स्थानिक वस्तूंचे १०० स्टॉल लावण्यात आले आहेत. यावेळी बोलताना नगराध्यक्षा पाटील यांनी महोत्सवामागची संकल्पना स्पष्ट केली. नगर परिषद आयोजित करीत असलेल्या या महोत्सवामुळे पर्यटकांचा ओढा मुरुडकडे वाढला आहे. त्यातून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळत असल्याचे त्या म्हणाल्या. पर्यटन महोत्सवासाठी होणारी गर्दी दरवर्षी वाढत असल्याचा दावाही त्यांनी केला.

यावेळी मुख्याधिकारी अमित पंडित, महोत्सवाचे कार्यध्याक्ष आदेश दांडेकर, उपकार्याध्यक्ष महेश भगत, मनसेचे माजी तालुकाध्यक्ष अरविंद गायकर, नगर परिषदेचे ओ. एस. परेश कुंभार, बांधकाम सभापदी मेघाली पाटील, गटनेत्या मुग्धा जोशी, संजय वेटकोळी, किशोर माळी, गोपाल चव्हाण यांच्यासह अन्य मान्यवर, तसेच नागरिक, पर्यटक उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -