Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र मुंबईच्या किनाऱ्यावर 'Food on Wheels'; कोळी बांधवांकडून BMC ने मागवल्या निविदा

मुंबईच्या किनाऱ्यावर ‘Food on Wheels’; कोळी बांधवांकडून BMC ने मागवल्या निविदा

Subscribe

मुंबई : मुंबईकरांना लवकरच दक्षिण मुंबईतील समुद्रकिनारी कोळी बांधवांच्या लज्जतदार मेजवाणीची चव चाखायला मिळणार आहे. मुंबई महानगर पालिकेकडून (BMC) लवकरच कुलाबा आणि कफ परेड या ठिकाणी पालिका ‘फूड ऑन व्हिल’ (Food on Wheels) उपक्रम सुरू करणार आहे. या उपक्रमासाठी कोळी आणि मच्छीमार बांधवांकडूनच निविदा मागवण्यात आल्या आहेत.

कोळी संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी बीएमसीकडून दक्षिण मुंबईतील समुद्रकिनारी ‘फूड ऑन व्हिल’ उपक्रम सुरू होणार आहे. यामुळे मुंबईकरांना आणि मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना कोळी बांधवांच्या ज्जतदार सुरमयी-कोलंबी फ्राय, बोंबिल तिखला, बांगडा-सुकटाचा सार, भरलेले पापलेट, झणझणीत जवळा, खेकड्याची चटणी अशा लज्जतदार पदार्थांची चव चाखता येणार आहे.

- Advertisement -

कोळी पदार्थांचा आस्वादासाठी अभिनव उपक्रम
मुंबई दक्षिण भागात मंत्रालय, गेट वे ऑफ इंडिया, एशियाटिक लायब्ररी, हॉर्निमन सर्कल, कुलाबा, कफ परेडसह मरीन लाइन्स समुद्र किनारा असलेला भाग मुंबई पालिका क्षेत्रातील ‘ए’ वॉर्ड येतो. या ठिकाणांना मुंबई महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून पर्यटक भेट द्यायला येत असतात. उच्चभ्रू वस्ती आणि अनेक महत्त्वाची आस्थापने असणाऱ्या संपूर्ण परिसराला मोठा समुद्र किनारा लाभलेला  असूनसुद्धा लोकांना ‘सी फूड’चा आस्वाद घेता येत नव्हता. त्यामुळे मुंबई पालिका प्रशासनाने कोळी बांधवांकडूनच कोळी पदार्थांचा आस्वाद मिळावा यासाठी हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येत असल्याची माहिती दिली आहे.

महिला बचत गट किंवा स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ‘फूड ऑन व्हील’ उपक्रम
पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली कोळीवाड्याच्या सौंदर्यीकरणाचा उपक्रम पालिकेने हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत वरळी, माहीम, बधवार पार्कचे काम सुरू करण्यात आले आहे. कोळीवाडे सौंदर्यीकरणासोबत पर्यटन वाढीसाठी बोटींच्या सफरीचा उपक्रमदेखील सुरू करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेकडून कोळी बांधवांना बोटीही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय महिला बचत गट किंवा स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ‘फूड ऑन व्हील’ उपक्रम राबवण्यात येणार आहे.

- Advertisement -

‘फूड ऑन व्हील’ला कफ परेड आणि कुलाब्यापासून होणार सुरुवात
‘फूड ऑन व्हील’ उपक्रम जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. या उपक्रमासाठी अंदाजे 34 लाख 51 हजारांचा खर्च होणार असून या निधीसाठी उपआयुक्त संगीता हसनाळे यांनी पाठपुराव करत आहेत. हा उपक्रम सुरुवातीला कफ परेड आणि कुलाबा या ठिकाणी राबवला जाणार असून त्यानंतर टप्प्याटप्प्याने या उपक्रमाचा विस्तार करण्याचे पालिकेने नियोजन केले आहे.

 

- Advertisment -