घरमहाराष्ट्रFood Poisoned : नांदेडमध्ये प्रसादातून दोन हजार जणांना विषबाधा, सर्वांची प्रकृती स्थिर

Food Poisoned : नांदेडमध्ये प्रसादातून दोन हजार जणांना विषबाधा, सर्वांची प्रकृती स्थिर

Subscribe

एकादशीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाच्या कार्यक्रमात भगर खाल्ल्याने भाविकांना शेकडो जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. परभणी आणि नांदेड या दोन्ही जिल्ह्यांत या घटना घडल्या आहेत.

नांदेड : लोहा तालुक्यात असलेल्या कोष्टवाडीमध्ये संत बाळूमामा यांच्या मेंढ्या गावात आलेल्या होत्या. या निमित्ताने गावकऱ्यांनी आणि परिसरातील भाविकांनी मिळून महाप्रसादाचे आयोजन केले होते. परंतु, हा महाप्रसाद खाल्ल्यामुळे दोन हजार भाविकांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. विषबाधा झालेल्या अनेकांना मध्यरात्रीपासून नांदेड, लोहा येथील खासगी आणि शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात येत आहे. परंतु, बाधितांच्या आकड्यामध्ये वाढ होण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. तर, परभणीतील माळसोन्ना गावामध्येही प्रसादाची भगर खाल्ल्याने 100 हून अधिक भाविकांना विषबाधा झाली आहे. या भाविकांना उपचारासाठी जिल्ह्यातील खासगी आणि जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Food Poisoned: Two thousand people poisoned by Prasad in Nanded)

हेही वाचा… ST Bus : पर्यावरणपूरक प्रवासासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; 5 हजार बसेसचे ‘एलएनजी’त रुपातंर

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, काल मंगळवारी (ता. 06 फेब्रुवारी) लोहा तालुक्यातील कोष्टवाडी येथे संत बाळूमामा यांच्या मेंढ्या सावरगावात आल्या होत्या. याचे निमित्त साधून आणि कालच एकादशीही असल्याने भगरीच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादासाठी लोहा तालुक्यातील अनेक भाविक आले होते. रात्री अनेकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. ज्यानंतर भाविक आपल्या घरी निघून गेले. परंतु, अचानकपणे मध्यरात्री प्रसादाची भगर खाल्ल्याने भाविकांना त्रास जाणवू लागला. ज्यानंतर सर्वात पहिला विषबाधा झालेला रुग्ण हा लोहा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात मध्यरात्री 3.30 वाजताच्या सुमारास दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

या घटनेतील पहिला रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यानंतर अचानकपणे रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने खळबळ उडाली. आतापर्यंत दोन हजार रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असलयाची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर या घटनेतील काही बाधितांना एसटी बस, काळी पिवळी, खासगी वाहनातून नांदेड, अहमदपूर येथेही उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. तर, या घटनेची माहिती मिळताच लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांनी मध्यरात्रीच खासगी रुग्णालये तत्काळ उघडून रुग्णांवर उपचार करण्याचे आदेश दिल्याची माहिती देण्यात आली.

- Advertisement -

परभणीतही 100 हून अधिक भाविकांना विषबाधा

परभणी तालुक्यातील माळसोन्ना गावामध्येही काल मंगळवारी सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास सुरू असलेल्या सप्ताहामध्ये एकादशी असल्याने भाविकांना भगरीचे वाटप प्रसाद म्हणून करण्यात आले होते. ही भगर खाल्ल्यानंतर काही वेळाने अनेकांना उलटी, जुलाब, चक्कर येणे असा त्रास सुरू झाला. परंतु, काही वेळातच हा त्रास अनेकांना होऊ लागला. त्यामूळे ग्रामस्थांनी तसेच भाविकांनी उपचारासाठी परभणी गाठली. रात्री 11 वाजेपर्यंत रुग्णालयात रुग्णांची उपचारासाठी गर्दी सुरूच होती. साधारण 100 हून अधिक जणांना ही विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आरोग्य यंत्रणेतील सूत्रांनी दिली आहे.

रुग्णांच्या प्रकृती प्रमाणे त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित करून उपचार केले जात होते. याशिवाय परभणी शहरातील काही खासगी दवाखान्यात सुद्धा अनेक रुग्णांनी धाव घेतली. जिल्हा आरोग्य यंत्रणेशिवाय खासगी रुग्णवाहिकाही या रुग्णांना आणण्यास माळसोन्ना येथे गेल्या होत्या. हा रुग्णांचा आकडा अंदाजे 100 हून अधिक असल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले. विशेष करून यामध्ये महिला, मुलांचा समावेश आहे. या घटनेत विषबाधा झालेल्या सर्व भाविकांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -