घरमहाराष्ट्रफुटबॉल स्पर्धेसाठी ३० लाख खर्च; प्रशासनाकडून ठेकेदाराचे पैसे देण्यास नकार

फुटबॉल स्पर्धेसाठी ३० लाख खर्च; प्रशासनाकडून ठेकेदाराचे पैसे देण्यास नकार

Subscribe

मनपाच्या या फिफा फुटबॉल देयकांचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर

उल्हासनगर मनपातर्फे २०१७ मध्ये शालेय आणि महाविद्यालयीन फिफा फुटबॉल सामन्यांचे आयोजन मनपाच्या वतीने करण्यात आले होते, यासाठी ३० लाख रुपये खर्च झाला होता. मात्र, ठेकेदाराने सादर केलेल्या देयकावर आक्षेप घेत मनपा प्रशासनाने ठेकेदाराला पैसे देण्यास नकार दिला आहे.

देशामध्ये फुटबॉल तळागाळातील शहरापासून खेड्यांपर्यंत पोहचावा यासाठी २ वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फुटबॉल सामने आयोजित करण्याचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले होते. त्यानुसार महानगरपालिकेच्या सर्व शाळांना फुटबॉलचे वाटपही झाले होते. फुटबॉल सामने स्व. बाळासाहेब ठाकरे संकुल येथे खेळवण्यात आले. त्याचे उद्घाटन तत्कालीन महापौर मिना आयलानी यांच्या हस्ते झाले तर आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली झाले होते. क्रीडा अधिकारी बाळासाहेब नेटके यांच्या देखरेखीखाली झालेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात क्रीडा सभापती रगडे आणि अतिरिक्त आयुक्त डॉ विजया कंठे यांच्यासह शहरातील अनेक राजकीय, क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते. ज्यात शाळांच्या शिक्षण शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

- Advertisement -

स्पर्धा झाली नसल्याचे सांगत देयकं ठेकेदाराला देण्यास नाकारले

या स्पर्धेच्या आयोजनाचे कंत्राट हे सिद्धांत, ओम मनिष व धनलक्ष्मी ईंटरप्राईजेस यांना दरपत्रकानुसार मिळालेले काम पूर्ण झाल्यावर ठेकेदाराने लेखा विभागात देयके सादर केली. परंतु, तत्कालीन मुख्य लेखाधिकारी दादा पाटील यांनी मात्र ही देयके लेखा विभागात उपलब्ध च नसल्याचे घोषित केले होते. आता विद्यमान आयुक्त सुधाकर देशमुख मात्र अशी कोणतीही स्पर्धा झाली नसल्याचे सांगून ही देयके ठेकेदाराला देण्यास नाकारले आहे.


हेही वाचा- सचिन, तन्वी मुंबई उपनगरचे कर्णधार

त्यामुळे ठेकेदाराने स्पर्धेचे छायाचित्र, देयकांच्या नक्कल आयुक्तांना सादर करून ही, आयुक्त ठेकेदाराच्या पत्राला किक देत, आपल्या निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे, मनपाच्या या फिफा फुटबॉल देयकांचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -