घरक्राइमधक्कादायक! पुण्यात 100 रूपयांसाठी विद्यार्थ्याचा मनगटापासून कापला हात

धक्कादायक! पुण्यात 100 रूपयांसाठी विद्यार्थ्याचा मनगटापासून कापला हात

Subscribe

अवघ्या 100 रूपयांसाठी विद्यार्थ्याचा मनगटापासून हात कापल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील पाषाण परिसरात 100 रूपयांसाठी चार जणांनी विद्यार्थ्याचा हात मनगटापासून कापला. या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे.

अवघ्या 100 रूपयांसाठी विद्यार्थ्याचा मनगटापासून हात कापल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील पाषाण परिसरात 100 रूपयांसाठी चार जणांनी विद्यार्थ्याचा हात मनगटापासून कापला. या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे. तसेच, 2 अल्पवयीन मुलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (For 100 Rupees The Students Hand Was Cut From The Wrist by 4 people In Pune)

मिळालेल्या माहितीनुसार, चार जणांच्या हल्ल्यात पंकज तांबोळी जखमी असून आशुतोष माने (24) यांनी पोलिसांकडे याबाबत फिर्याद दिली आहे. प्रणव काशिनाथ वाघमारे (18) आणि गौरव गौतम मानवतकर (20) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. फिर्यादी आशुतोष माने हे त्यांचे मित्र अभिजित सानमुटे, साजिद शेख, स्वप्निल पाटील, मिहीर देशपांडे हे पाषाण परिसरात राहणारे रहिवाशी आहेत.

- Advertisement -

31 डिसेंबर रोजी मेस बंद असल्यामुळे माने, साजीद शेख, पंकज तांबोळी हे तिघेजण रात्री पावणे 12 वाजण्याच्या सुमारास साई चौकात आले. तेथे पंकजचा मित्र मयुर फुंदे हा देखील जेवण करण्यासाठी आला होता. सर्वांनी हर्षदा या हॉटेलमध्ये जेवण केले. त्यानंतर या ठिकाणी मोटारसायकलवरून 2 मुले आली आणि त्यांनी मयुर व पंकज यांच्याकडे 100 रूपयांची मागणी केली

त्यावेळी पंकजने पैसे नसल्याचे सांगितले. त्यानंतर या मुलांनी आणखी दोन जणांना तिथे बोलवले. तसेच, पंकजला शिवीगाळ केली आणि त्याच्या डाव्या हातावर धारदार हत्याराने वार केले. काही क्षणातच पंकजचा डावा हात मनगटापासून निखळून पडला.

- Advertisement -

याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंकजला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली असून इतर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.


हेही वाचा – औरंगाबादसह मराठवाड्यातील चार जागांवर भाजपाचे लक्ष; भागवत कराडांची माहिती

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -