घरमहाराष्ट्रआगामी निवडणुकांसाठी भाजपाने कार्यकर्त्यांना कामाला लावले, टार्गेटही दिलं; काय आहे रणनीती?

आगामी निवडणुकांसाठी भाजपाने कार्यकर्त्यांना कामाला लावले, टार्गेटही दिलं; काय आहे रणनीती?

Subscribe

BJP Planned for Upcoming Elections |आपली वाट पाहत आहेत. मोठे पक्ष प्रवेश आम्ही करू. पण प्रत्येक बुथवर किमान २५ पक्ष प्रवेश कार्यकर्त्यांनी करा, असे थेट आवाहन करत भाजपाने आपल्या कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांसाठी कामाला लावले आहे.

BJP Planned for Upcoming Elections | मुंबई – जनतेसाठी अहोरात्र मेहनत करणारे नेतृत्व आपल्याकडे आहे. महाराष्ट्राच्या कानाकोप-यात हजारोजण आज भाजपमध्ये येण्यास तयार आहेत. आपली वाट पाहत आहेत. मोठे पक्ष प्रवेश आम्ही करू. पण प्रत्येक बुथवर किमान २५ पक्ष प्रवेश कार्यकर्त्यांनी करा, असे थेट आवाहन करत भाजपाने आपल्या कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांसाठी कामाला लावले आहे. (BJP Strategy for upcoming elections)

मुंबई भाजपच्या कार्यकारिणीची बैठक आज दादर येथील वसंत स्मृती सभागृहात पार पडली. या बैठकीला सकाळच्या पहिल्या सत्रात भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी मार्गदर्शन केले. आमदार अतुल भातखळकर यांनी राजकीय प्रस्ताव मांडला. त्याला आमदार अमीत साटम यांनी अनुमोदन दिले. मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही मार्गदर्शन केले. या बैठकीला खासदार गोपाळ शेट्टी, पुनम महाजन, मनोज कोटक यांच्यासह सर्व आमदार आणि मुंबई पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पक्षश्रेष्ठींनी उपस्थित कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आहे. आगामी निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी कसं काम करावं याचं मार्गदर्शन तर केलंच, शिवाय त्यांना टार्गेटही देण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मोदी विश्वव्यापी, फडणवीस सारथी तर आशिष शेलार अर्जुन; भाजपाच्या बैठकीत काय ठरलं?

प्रत्येक पदाधिका-यांनी २००० घरी प्रवास करणे अपेक्षित असून ५०० घरी धन्यवाद मोदी, ५०० घरांमध्ये फ्रेंडस ऑफ बीजेपी, ५०० युवा वॉरियर्स अशा स्वरुपात कामाला लागायचे आहे. येणारा काळ हा आपला आहे. वातावरण उत्तम, सक्षम नेतृत्व, निर्णय घेणारे केंद्रात आणि राज्यात सरकार यामुळे ‘अभी नही तो कभी नही’ असेही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

- Advertisement -

देशाचे गृहमंत्री अमितभाई शाह मुंबईत आले त्यावेळी बाळासाहेबांची शिवसेनेसह एनडीएचे १५० नगरसेवक मुंबई महापालिकेत विजयी होतील आणि भाजपाचाच महापौर होईल. हा जो संकल्प सोडला आहे तो आपल्याला सर्वांना पूर्ण करायचा आहे. त्या दृष्टीने आपल्याला कामाला लागायचे आहे असे कार्यकर्त्यांना आवाहन करताना आमदार आशिष शेलार यांनी गेल्या २५ वर्षात मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेने पूर्ण केलेले एक काम दाखवा असे सांगत जोरदार हल्लाबोल केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -