घरमहाराष्ट्रपुणेसक्तीने धर्मपरिवर्तन, रक्त सांगून द्राक्षाचा रस दिला प्यायला; पुण्यातील घटनेने खळबळ

सक्तीने धर्मपरिवर्तन, रक्त सांगून द्राक्षाचा रस दिला प्यायला; पुण्यातील घटनेने खळबळ

Subscribe

Forced conversion in Pune | पुणे – सक्तीने धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसंच, येशूचे रक्त म्हणून द्राक्षाचे पाणी प्यायला दिल्याचा दावाही तक्रारदारांकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी पुणे आणि आळंदी पोलिसांकडून तपास सुरू असून पोलिसांनी ४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा पुरोगामी महाराष्ट्रात राजकीय नेत्यांनी जोपासलेल्या अंधश्रद्धा!

- Advertisement -

पिंपरी आणि आळंदीमध्ये हा प्रकार घडला आहे. १ जानेवारीच्या मध्यरात्री हा संतापजनक प्रकार एका घरात घडला. याप्रकाराचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे.व्हिडीओनुसार, येशू तुमचे देव आहेत. इतर देव घरातून बाहेर काढा, असं एक महिला सांगते आहे. तसंच, या एक महिला प्रार्थना म्हणून दाखवते. उपस्थितांकडून प्रार्थनाही म्हणवून घेते. आजूबाजूला छोटे-छोटे ग्लास ठेवण्यात आले आहेत. यातमध्ये येशूंचं रक्त आहे, असंही ती महिला सांगते. मात्र, हे रक्त नसून द्राक्षाचं पाणी असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.

समोर आलेल्या व्हिडीओवरून हा प्रकार धर्मपरिवर्तनाचा आहे हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे याप्रकरणी आता पुणे आणि आळंदी पोलिसांकडून अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – संकल्प अंधश्रद्धा निर्मूलनाचा….गावाच्या विकासाचा !

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -