घरताज्या घडामोडीसंजय राठोड यांचा मंत्रीपदाचा राजीनामा, मुख्यमंत्र्यांनी केला मंजूर?

संजय राठोड यांचा मंत्रीपदाचा राजीनामा, मुख्यमंत्र्यांनी केला मंजूर?

Subscribe

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांना अखेर राजीनामा द्यावा लागला आहे. मुख्यमंत्र्यांकडून संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर केला असल्याचे कळते. वनमंत्री संजय राठोड यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी हा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. यावेळी राज्य मंत्रीमंडळातील अनिल परब, एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समक्ष हा राजीनामा देण्यात आला. राजीनामा देतेवेळी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच मंत्रीमंडळ बैठकी आधीच या राजीनाम्याची औपचारिकता पूर्ण झालेली आहे.

याआधीच मुख्यमंत्र्यांकडून संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे संकेत गेले होते. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडीवर विरोधकांचा वाढता दबाव तसेच घटक पक्षांचा आक्रमकपणा पाहता मुख्यमंत्र्यांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. अधिवेशन काळात सत्ताधारी महाविकास आघाडीला लक्ष्य करण्यात येईल यामुळेच संजय राठोड यांना राजीनामा देण्यासाठी सांगण्यात आले. विरोधकांनीही अधिवेशन चालू न देण्याचे स्पष्ट केल्यानेच महाविकास आघाडीला संजय राठोड यांचा राजीनामा घेण्याशिवाय पर्याय नव्हता असे बोलले जात आहे. मुख्यमंत्र्यांकडून याबाबतची माहिती ही मंत्रीमंडळाच्या पत्रकार परिषदेनंतरही देण्यात येऊ शकते. तसेच अधिवेशनाच्या काळात सभागृहातही माहिती दिली जाईल असे समजते. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात यापुढे पोलीस तपासात काय निष्पन्न होते यावरच संजय राठोड यांची मंत्रीमंडळातील पुर्नप्रवेश अवलंबून आहे. सध्या हे प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात आले आहे. या प्रकरणातील चौकशी अहवालानंतरच संजय राठोड यांचा महाविकास आघाडीतील पुढचा टप्पा निश्चित होईल. वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर पुढचे काही दिवस तरी हे पद रिक्तच राहील असे समजते.

- Advertisement -

हेही वाचा – संजय राठोडांचा राजीनामा आला नाही, तर भाजपचे आमदार राजीनामे देणार


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -