घरमहाराष्ट्रसत्य परेशान हो सकता है,पराजित नही- वनमंत्री मुंनगंटीवार

सत्य परेशान हो सकता है,पराजित नही- वनमंत्री मुंनगंटीवार

Subscribe

अवनी वाघिणीच्या शिकारीनंतर वनमंत्री सुधीर मुंनगंटीवार यांच्यावर विरोधपक्षाने कसून टीका केली होती. यानंतर आपली बाजू मांडली आहे.

अवनी वाघीणीच्या शिकारीनंतर सरकारवर टीकेजी झोड उडाली होती. यानंतर आता वनमंत्री सुधीर मुंनगंटीवार यांनी यावर भाष्य केले आहे. अवनी वाघीण नरभक्षक झाली होती. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसारच तीचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. यामध्ये नियमांचे कोणतेही उल्लंघन झाले नाही. सत्य परेशान हो सकता है, पराजित नही हो सकता असे सांगत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांचा राजीनामा मागणाऱ्याना सडेतोड उत्तर दिले. तसेच माझा राजीनामा मनेका गांधी नव्हे भाजपा अध्यक्ष अमित शहा मागू शकतात. इतर कोणालाही राजीनामा मागण्याचा अधिकार नाही,असेही ते म्हणाले. ते पिंपरीतील एच.ए मैदनावर आतंरराष्ट्रीय फुलांच्या प्रदर्शनाचे उद्घाघटन त्यांच्या हस्ते झाले.त्यावेळी ते बोलत होते.

काय म्हणाले मुंनगंटीवार

ते म्हणाले की, सच परेशान हो सकता है पराजित नही हो सकता.सच सच होता है.राजीनाम्याची मागणी केल्याने माझं खात जात नाही किंवा कोणी मागणी केल्याने माझं प्रमोशन होत नाही.राजीनाम्याविषयी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शहा ठरवतील किंवा देशाचे पंतप्रधान,तेव्हा राजीनाम्यावर निर्णय होईल.मी त्यांचा राजीनामा मागायचा आणि त्यांनी माझा हे राजकारणात अपेक्षित नसत.अस वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले.

- Advertisement -

वन्य प्राण्यांच्या संवर्धन संरक्षणाच्या दृष्टीने काम करतो. इतर राज्यात जेवढे निर्णय होत नसतील तेवढे महाराष्ट्र राज्यात होतात.अश्या प्रसंगी एकीकडे वाईल्ड लाईफ एक्सपर्ट आहेत आणि दुसरीकडे वाईल्ड अनिमल्स लव्हर्स आहेत यातील हा संघर्ष आहे.वाईल्ड लाईफ एक्सपर्ट म्हणतात मॅन हिटर झाल्यावर वाघ नावाची प्रजाती धोक्यात आणू नये.कारण लोक वनविरोधी होऊ नयेत यावर चर्चा होत असल्याचे देखील वनमंत्री म्हणाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -