Wednesday, August 4, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र वन अधिकार्‍याने शोधला कळसूबाई शिखरावर जाणारा रस्ता

वन अधिकार्‍याने शोधला कळसूबाई शिखरावर जाणारा रस्ता

पर्यटक आणि भाविकांचा प्रवास होणार सुकर

Related Story

- Advertisement -

कळसूबाई शिखरावर होणारी गर्दी कमी होण्यासाठी वन विभागाचे वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी कळसूबाई पश्चिम डोंगररांगेतील पांजरे गावातील एका पारंपरिक रस्त्याच्या शोध लावला आहे. या रस्त्याची निर्मिती केल्याने पर्यटक व भाविकांना आता पांजरे गावातून सहजरित्या शिखरावर पोहचता येणार आहे. त्यामुळे शिखरावर जाताना होणारी चेंगराचेंगरी थांबून नव्या रस्त्याने भाविक व पर्यटकांना ये-जा करता येणार आहे.

वन विभागाने कळसूबाई शिखराकडे जाणार्‍या या पारंपरिक रस्त्यातील अडथळे व संभाव्य धोके दूर केले आहेत. वनरक्षक संजय गिते यांनी कळसूबाई नाव संपूर्ण गड असलेल्या डोंगराला देण्यासाठी दीड महिना प्रयत्न करून हा प्रयोग यशस्वी केला आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. १६ दिवसांत १६ ग्रामस्थांनी पांजरे ते कळसुबाई शिखरावर जाणारी पुर्वीची पायवाट दुरुस्त केली आहे. ही पायवाट निसर्गाने नटलेली आहे. काही अवघड ठिकाणी शिडी, रेलिंग बसवून सोपी निसर्गरम्य पायवाट होईल असे वरिष्ठ रवींद्र सोनार, सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे, वनक्षेत्रपाल अमोल आडे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी पांजरे कळसुबाई शिखरावर मार्गाची पाहणी करून प्रस्तावित विकास कामासाठी मंजुरी मिळवून दिली. १ मे २०२१ रोजी काम सुरू झाले. ६० मजुरांसोबत सलग ४० दिवसांत शिडी, रेलिंगचे काम पूर्ण झाले. त्यामुळे पांजरे कळसुबाई निसर्ग पायवाट पर्यटकांना आकर्षित करीत आहे.

निसर्ग पायवाटेस पर्यटक, भाविकांची मिळतेय पसंती

- Advertisement -

कळसूबाई शिखरावर जाणारा कठीण रस्ता पांजरे गावातून जात असल्याचे समजले. त्यानंतर या रस्त्यातील अडथळे दूर केले. आवश्यक ठिकाणी शिड्या व रेलिंग टाकले आहे. त्यामुळे या निसर्गरम्य रस्त्यावरुन पर्यटक व भाविकांना शिखरावर जाता येणार आहे. या निसर्गरम्य पायवाटेस पर्यटक व भाविकांच्या पसंतीस उतरला आहे. या रस्त्यामुळे आदिवासी ग्रामस्थांना रोजगारही उपलब्ध झाला आहे, असे वन्यजीव विभाग, नाशिकचे सहाय्यक वनसंरक्षक, गणेश रणदिवे यांनी सांगितले.

- Advertisement -