घरमहाराष्ट्रभाजपचे माजी आमदार मोहन फड यांच्या मुलाचा अपघातात मृत्यू

भाजपचे माजी आमदार मोहन फड यांच्या मुलाचा अपघातात मृत्यू

Subscribe

परभणी शहरातील उड्डाणपुलावर मोटारसायकलचा अपघात

भाजपचे माजी आमदार मोहन फड यांच्या मुलाचा अपघातात मृत्यू झाला आहे. परभणी शहरातील उड्डाणपुलावर मोहन फड यांच्या मुलाचा अपघात झाला. नेमका हा अपघात कसा झाला याबाबत अद्याप माहिती समजलेली नाही. मात्र, दुचाकीचा पुढील भागाचा अक्षरश: चकानाचूर झाला आहे. यावरुन हा अपघआत किती भयानक असेल, याची कल्पना येत आहे.दरम्यान, हा अपघात कसा झाला याबाबत पोलीस तपास करत आहेत.

भाजपचे माजी आमदार मोहन फड यांचा लहान मुलगा पृथ्वीराज फड हा मुंबईत शिकतो. लॉकडाऊनमुळे मागच्या काही दिवसांपासून तो परभणीत आला होता. आज संध्याकाळी पावणे नऊच्या सुमारास पृथ्वीराज हा त्याची डुकाटी या मोटारसायकलवरून गंगाखेड रस्त्याच्या दिशेने जात असताना उड्डाणपुलावर त्याचा अपघात झाला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेलं. मात्र, उपचार पूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच फड कुटुंब आणि त्यांचे नातेवाईक जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचले आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -