Wasim Rizvi: इस्लाम धर्मीय वसीम रिझवी हिंदू धर्म स्वीकारणार, कारण वाचा

former chairman of shivsena waqf board Wasim Rizvi accept hindu cast today
Wasim Rizvi: इस्लाम धर्मीय वसीम रिझवी हिंदू धर्म स्वीकारणार, यती नरसिंहानंद गिरी महाराज करणार धर्मपरिवर्तन

इस्लाम धर्मीय वसीम रिझवी हिंदू धर्म स्वीकारणार आहेत. रिझवी शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष राहिले आहेत. त्यांनी आपल्या मृत्यू पत्रामध्ये मृत्यू झाल्यानंतर दफन न करता हिंदू धर्मानुसार अंतिम संस्कार करण्यात यावे असे म्हटल आहे. कुराणमधील श्लोकांना सर्वोच्च न्यायालयात रिझवी यांनी आव्हान दिलं आहे. या याचिकेमुळे ते चर्चेत आले असून त्यांना जीवे मारण्याचा कट रचण्यात येत असल्याचाही रिझवींनी आरोप केला आहे. दसना देवी मंदिराचे महंत यती नरसिंहानंद गिरी महाराज रिझवीचे धर्मपरिवर्तन करतील.

शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी इस्लाम धर्माचा त्याग करुन हिंदू धर्माचा स्वीकार करणार आहेत. सोमवारी १० ते १०.३० च्या दरम्यान गाझियाबादमधील दसना देवी मंदिरात हिंदू धर्म स्वीकरण्याचा विधी होणार आहे. हे धर्मपरिवर्तन सर्व विधींसह होणार असून दसना देवी मंदिराचे महंत यती नरसिंहानंद गिरी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये रिझवी हिंदू धर्म स्वीकारतील.

रिझवींची मृत्यू पत्रात दफन न करण्याची विनंती

वसीम रिझवी यांनी काही दिवसांपुर्वी त्यांचे मृत्यूपत्र जारी केलं आहे. या मृत्यूपत्राची चर्चा सुरु होती. त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात दफन करु नये अशी विनंती केली आहे. तसेच दफन न करता हिंदू धर्मानुसार मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात यावेत अशी घोषणा केली आहे. तसेच फक्त नरसिंहानंद गिरी महाराजच चितेला अग्नी देतील असं रिझवींनी त्यांच्या मृत्यूपत्रात लिहंलं आहे.

मुस्लिमांकडून ठार मारण्याचा कट

वसीम रिझवी यांनी कुराणमधील २६ श्लोकांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. यामुळे त्यांच्यावर मुस्लिमांकडून हल्ला करण्याचा आणि शिरच्छेद करण्याचा कट रचण्यात येत आहे. अशी माहिती रिझवी यांनी स्वतः एक व्हिडिओ जारी करत दिली आहे. मुस्लिम लोकांना मला मारायचे असून दफन करण्यासाठी कब्रस्तानात जागाही देणार नाही असे सांगितले आहे. यामुळेच मेल्यानंतर माझ्या मृतदेहावर हिंदू धर्मानुसार अंत्यसंस्कार करण्यात यावेत असे रिझवींनी व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

कुराणमधील श्लोकांवरील य़ाचिकेत काय म्हटलंय?

वसीम रिझवी यांनी कुराणातील २६ श्लोकांविरोधात याचिका केली आहे. हे श्लोक कुराणमधून काढून टाकण्यात यावेत अशी मागणी रिझवींनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर ती फेटाळली गेली आहे. मात्र या याचिकेमुळे रिझवींच्या अडचणी वाढल्या असून ते मुस्लिम संघटनांच्या निशाण्यावर आहेत. रिझवी मुस्लिम विरोधी संघटनांचे एजंट असल्याचे मुस्लिम संघटनांचे म्हणणे आहे.


हेही वाचा : MSP सह शेतकऱ्यांवरील तक्रारी मागे घेण्यावर केंद्र सकारात्मक, शेतकरी आंदोलन मागे घेण्याची शक्यता