घरताज्या घडामोडीमाजी मुख्यमंत्री मनोहर जोशींची प्रकृती बिघडली, ठाकरे कुटुंबाने घेतली भेट

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींची प्रकृती बिघडली, ठाकरे कुटुंबाने घेतली भेट

Subscribe

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. मनोहर जोशी यांना काल(सोमवार) सायंकाळी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी हिंदुजा रुग्णालयात मनोहर जोशींची भेट घेतली.

मागील काही काळापासून मनोहर जोशी हे राजकारणात सक्रिय नव्हते. काल संध्याकाळी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं. जोशींना मेंदूशी संबंधित व्याधी आहे. अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आले. सध्या त्यांच्यावर न्यूरोलॉजिस्ट डॉ. चारुलता संकला यांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. मनोहर जोशी यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ज्येष्ठ आणि जुन्या शिवसैनिकांमध्ये मानाचे स्थान असणाऱ्या नेत्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न केले होते.

मध्यंतरीच्या काळात शिंदेंनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटही घेतली होती. या काळात गजानन किर्तीकर यांच्यासह शिवसेनेतील काही ज्येष्ठ पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते. मात्र, मनोहर जोशी हे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहिले होते.

- Advertisement -

हेही वाचा : त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरण; त्यादिवशी नेमकं काय घडलं? नितेश राणेंनी सांगितलं सविस्तर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -