घरताज्या घडामोडीकदाचित अब्दुल सत्तारांनाच शिक्षणमंत्री करतील, पृथ्वीराज चव्हाण यांचा टोला

कदाचित अब्दुल सत्तारांनाच शिक्षणमंत्री करतील, पृथ्वीराज चव्हाण यांचा टोला

Subscribe

'सरकार त्यांचेच आहे, कदाचित अब्दुल सत्तारांनाच शिक्षणमंत्री करतील', असा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सत्ताधारी शिंदे गटाला लगावला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) घोटाळा प्रकरणात माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावे आल्याने खळबळ उडाली आहे

कोल्हापुर : ‘सरकार त्यांचेच आहे, कदाचित अब्दुल सत्तारांनाच शिक्षणमंत्री करतील’, असा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सत्ताधारी शिंदे गटाला लगावला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) घोटाळा प्रकरणात माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावे आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून आता विरोधकांनी अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधण्यास सुरूवात केली. (former cm prithviraj chauhan slams mla abdul sattar on TET scam)

राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोल्हापुर येथे पत्रकार परिषदेत घेतली यावेळी बोलताना त्यांनी सत्ताधारी शिंदे गटावर निशाणा साधला. “याप्रकरणी विधीमंडळाचे अधिवेशन येईल त्यामध्ये हा विषय मांडू आम्ही, सरकार त्यांचेच आहे. अब्दुल सत्तारांना कदाचीत शिक्षण मंत्रीच करतील. अशाप्रकारे राज्यात अस्थिरता निर्माण झाली. त्यावेळी अशा प्रकारचे घोटाळ्यांकडे वैगरे बघायला कोणाला वेळच नसतो. सरकारमध्ये मंत्री कोण राहणार? कोणत्या मंत्र्याला कोणते खाते द्यायचे? यामध्ये सगळे व्यस्त असतात. बाकीच्या सगळ्या गोष्टी लपून जात आहे. त्यामुळे राज्यामध्ये चांगल्या प्रशासनाची जी परंपरा होती, ती आता नष्ट होत आहे”, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.

- Advertisement -

हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख या दोन्ही शिक्षिका अब्दुल सत्तार यांच्या मुली असून २०२० मध्ये त्या अपात्र ठरल्या आहेत. तसेच, त्यांची आणखी एक मुलगी आणि मुलगाही अपात्र ठरले आहेत. सायबर पोलीस आणि परीक्षा परिषद यांनी जी यादी प्रसिद्ध केली त्यामध्ये या चारही मुलांचा समावेश आहे. यां चोघांची नावे समोर आली असली, तरी त्यांनी नेमक्या कोणत्या एजंटला पैसे दिले याची माहिती अद्याप अस्पष्ट आहे. त्यामुळे आता अब्दुल सत्तार यांच्या अडचणीच वाढण्याची शक्यता आहे.

परीक्षा परिषदेकडून जी यादी जाहीर करण्यात आली. त्यामधील सर्व अपात्र असणाऱ्या उमेदवारांनी पात्र होण्यासाठी सुपे यांना पैसे दिले होते. परंतु, सुपे यांच्याकडून अपात्र उमेदवारांना पात्र असण्याचे प्रमाणपत्र मिळाले नव्हते. या उमेदवारांमध्ये आता अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या मुली हिना आणि उजमा तसेच, त्यांचा मुलगा व आणखी एका मुलीचे नाव असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी चौघांचीही प्रमाणपत्र रद्द करण्यात आली आहेत. याप्रकरणी बदनामीसाठी हा सगळा कट रचल्याचे अब्दुल सत्तार यांनी म्हटले.

- Advertisement -

हेही वाचा –  टीईटी घोटाळा : अब्दुल सत्तारांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रं रद्द

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -