घरताज्या घडामोडीकोश्यारींनी आमदारांच्या संविधानिक अधिकारांवर गदा आणली, माजी मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

कोश्यारींनी आमदारांच्या संविधानिक अधिकारांवर गदा आणली, माजी मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

Subscribe

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपाल पदावरून पायउतार झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय पक्षांकडून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, कोश्यारींनी आमदारांच्या संविधानिक अधिकारांवर गदा आणली, असा हल्लाबोल काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, कोश्यारी स्वतः मुख्यमंत्री होते. त्यामुळं ते सक्रिय राजकारणातून बाहेर जावू शकले नाहीत. महाराष्ट्रात आल्यावरही त्यांनी वेगवेगळी विसंगत वक्तव्यं करत स्वतःवर आक्षेप ओढवून घेतले. कारण, नसताना बेजबाबदार वक्तव्येही त्यांनी सातत्यानं केली. कॅबिनेट मंत्री मंडळानं 12 जणांची यादी दिली होती. त्यांना आमदार म्हणून मान्यता न देता 15 महिने त्यावर निर्णय घेतला, त्यामुळं आमदारांच्या संविधानिक अधिकारांवर गदा आणली, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

- Advertisement -

राज्यपाल कोश्यारी यांची कारकीर्द अत्यंत वादग्रस्त ठरली आहे. त्यांचा राजीनामा घ्यावा, त्यांना परत बोलवावं असं महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न झाले. राज्यपाल पद हे संविधानिक पद आहे. आता त्यांना कोणतेही अधिकार नाहीत, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

महाविकास आघाडीचं सरकार जावून शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर कोश्यारी यांचं वागणं अत्यंत वादग्रस्त ठरलं. सतत आपण चर्चेत राहिलं पाहिजे, असा त्यांचा हट्ट होता. त्यामुळं राज्यपाल पदाची गरिमा त्यांनी नष्ट केली, असं म्हणावं लागेल, असं चव्हाण म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : उद्धव ठाकरेंनी मोदींच्या ‘वन नेशन वन इलेक्शन’ला पाठिंबा द्यावा, देवेंद्र फडणवीसांचा पलटवार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -