घरताज्या घडामोडीरुपयाने नीचांक, महागाईने उच्चांक गाठलाय; सद्यस्थितीवर ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

रुपयाने नीचांक, महागाईने उच्चांक गाठलाय; सद्यस्थितीवर ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Subscribe

अटलबिहारी वाजपेयीजी (Atal Bihari Vajpayee) एकदा बोलले होते, ‘सत्ता आती है, जाती है. लेकीन देश रहना चाहिये.’ देश राहण्यासाठी सगळ्या पक्षांनी मिळून काम नाही केले तर आपणच आपल्या देशाचे शत्रू आहोत. कारण देशाला आजसुद्धा अनेक प्रश्न भेडसावताहेत. सध्या रुपयाने नीचांक आणि महागाईने उच्चांक गाठलाय. बेरोजगारी आहे. अशा सगळ्या गोष्टींकडे कुणाचे लक्ष नाही. थातूरमातूर मलमपट्टी केली जाते, असं म्हणत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Leader Uddhav Thackeray) यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. दैनिक सामनाचे संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दोन दिवस मॅरेथॉन मुलाखत घेतली. आज प्रसारित झालेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकावर टीका केली.

हेही वाचा पवारांनी तुम्हाला मुख्यमंत्री करून शिवसेना संपवली, उद्धव ठाकरे म्हणतात…

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून देशात विविध नागरी समस्या भेडसावत आहेत. मात्र, केंद्र सरकारकडून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं, पण दडपशाही करून विरोधकांवर दबाव आणला जातो, असा आरोप अनेक विरोधी पक्ष करत आहेत. त्यामुळे देशात लोकशाही राहील का असा प्रश्न उपस्थित होतो. असाच प्रश्न संजय राऊतांनी ठाकरेंना विचारला. त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, देशातील आताची परिस्थिती अगदी तशीच आहे. मात्र विरोधी पक्षाची भीती सत्ताधाऱ्यांना वाटायला लागली असेल तर तो त्यांचा कमकुवतपणाच म्हणावा लागेल. लोकशाहीचा अर्थ असा नाही की, प्रत्येक वेळी विजय मिळेल. शिवसेना, काँग्रेस, भाजप कुठलाही पक्ष असो, त्यांना सातत्याने विजय प्राप्त होत नसतात. जय-पराजय सगळ्यांचेच होत असतात. नवीन पक्ष उदयाला येत असतात. तेही काही काळ चमकून जातात. हीच तर लोकशाहीची वेगळी गंमत आहे. पण सर्वकाही तुमच्या बुडाखाली ठेवायचे अशी राक्षसी महत्त्वाकांक्षा येते, तेव्हा मात्र त्यांना विरोधी पक्षाची भीती वाटायला लागते. मीही मुख्यमंत्री होतो. आज नाहीय, पण तुमच्यासमोर पहिल्यासारखा बसलोय. काय, फरक काय पडला? सत्ता येते आणि जाते. मग सत्ता परत येते. माझ्यासाठी म्हणाल तर, सत्ता असली काय आणि नसली काय, काहीच फरक पडत नाही. अटलबिहारी वाजपेयीजी एकदा बोलले होते, ‘सत्ता आती है, जाती है. लेकीन देश रहना चाहिये.’ देश राहण्यासाठी सगळय़ा पक्षांनी मिळून काम नाही केले तर आपणच आपल्या देशाचे शत्रू आहोत. कारण देशाला आजसुद्धा अनेक प्रश्न भेडसावताहेत. सध्या रुपयाने नीचांक आणि महागाईने उच्चांक गाठलाय. बेरोजगारी आहे. अशा सगळय़ा गोष्टींकडे कुणाचे लक्ष नाही. थातूरमातूर मलमपट्टी केली जाते.

हेही वाचा – दिल्लीवाल्यांना मराठी माणसांकडून मराठी माणसांचीच डोकी फोडायची आहेत, ठाकरेंकडून केंद्र सरकारवर आसूड

- Advertisement -

अग्निवीरातून वीर बाहेर पडले

केंद्र सरकारने अग्नीवीर संकल्पना आणली, असं संजय राऊतांनी म्हटल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, हो, पण त्यातूनसुद्धा वीर बाहेर पडले ना! त्यांच्या डोक्यात ‘अग्नी’. म्हणूनच ते ‘वीर’ बाहेर पडले. रस्त्यावर उतरले. त्यांचे म्हणणे आहे, आम्हाला तुम्ही टेंपररी बेसिसवर ठेवताय. आमचा तरुण रस्त्यावर उतरला आहे. आयुष्य, संसार हा कायमचा असतो. टेंपररी बेसवर आम्हाला रोजगार देणार असाल तर पुढे काय होणार, असा त्यांचा प्रश्न आहे.

कंत्राटी सैनिक ही कल्पना तुम्हाला कशी वाटते?- संजय राऊत

तुम्हाला कंत्राटी पद्धत हवी ना, मग करायचेच आहे तर सगळीकडेच कंत्राटी पद्धत करा. राज्यकर्ते पण कंत्राटी आणा. सगळ्यासाठीच आपण मग एक एजन्सी नेमू आणि ठेवू कामाला, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा – आपल्या देशात सध्या लोकशाही संपून हुकूमशाही आली, असे मी म्हणणार नाही, पण…

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -