नागपूर: भरदिवसा काँग्रेसचे माजी नगरसेवक देवा उसरे यांची निर्घृण हत्या!

Former Congress corporator Deva Usare murder in nagapur
नागपूर: भरदिवसा काँग्रेसचे माजी नगरसेवक देवा उसरे यांची निर्घृण हत्या!

नागपुरमध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक देवा उसरे यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सकाळी फेरफटका मारण्यासाठी ते घराबाहेर पडले होते. त्याच दरम्यान देवा उसरे यांच्यावरती हल्ला झाला आहे. भरदिवसा दोन अज्ञात आरोपींना सुऱ्याने वार करत त्यांची हत्या केली आहे. या हत्ये मागचं नेमकं कारण काय आहे हे अद्याप स्पष्ट झाले नसून जुन्या वादातून हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे.

नक्की काय घडलं?

देवा उसरे गड्डीगोदाम परिसरातील ते नगरसेवक होते. सकाळी नेहमी ते त्याच्या वार्डमध्ये बुलेट घेऊन फेरफटका मारत असतं आणि नंतर भारत टाकी चौकामध्ये ते चहा पिण्यासाठी थांब असतं. तिथे बरीच मंडळी त्यांनी भेटायची. आज देखील त्यांनी असंच केलं. त्याची ही सवय मारेकरांना माहित असल्यामुळे मारेकरी तिथे दबा धरून बसले असावे असे समोर येत आहे. त्यांची हत्या करणारे दोन मारेकरी होते असे तिथल्या आजूबाजूच्या लोकांचं म्हणणं आहे.

आज देवा उसरे जनता टी स्टॉलच्या इथे जागा आहे तिथे ते बसले होते. त्यावेळेस पहिल्यांदा आरोपींनी त्यांच्या पाठीवर सुऱ्याने वार केला. नंतर त्यांना लाकडी रॉडने जबरदस्त मारले असून इतर ठिकाणी देखील त्याच्यावर वार केले आहेत. यावेळेस ते रक्तबंबाळ झाले होते. घटनास्थळी अजूनही रक्ताच्या थारोळ्या आणि रॉडचे तुकडे आहेत. या घटनेनंतर त्यांना जवळच्या शासकीय वैद्यकीय हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र तिथल्या डॉक्टरांनी त्यांना मृत्यू घोषित केलं. या घटनेनंतर मारेकरी फरार झाले असून सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे.


हेही वाचा – एकतर्फी प्रेमातून महिलेची हत्या, मृतदेह झाडाला लटकवला!