Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र वाढदिवशीच काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचं निधन

वाढदिवशीच काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचं निधन

Related Story

- Advertisement -

रायगडमधील अलिबाग उरण मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचं आज निधन झालं.पहाचे पाच वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ठाकूर यांचा आज १५ जुलैला ७४ वा वाढदिवस होता. दुर्दैवाने वाढदिवशीच त्यांची प्राणज्योत मालवली.

मधुकर ठाकुर हे गेल्या तीन ते चार वर्षांपासून आजारी होते. अखेर आज त्यांनी वाढदिवशीच अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी दोन वाजता त्यांच्या पार्थिवावर आलिबाग तालुक्यातील सातीर्जे या त्यांच्या मुळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. मधुकर ठाकुर यांनी झिराड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य व नंतर आमदार अशी त्यांची राजकीय कारकिर्द आहे. २००४ ते २००९ या कालावधीत ते अलिबाग- उरण मतदारसंघाचे आमदार होते. रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष, प्रदेश काँग्रेसचे विशेष निमंत्रित सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे.

राजकीय कारकीर्द

  • मधुकर ठाकूर यांनी २००४ मध्ये विधानसभा निवडणुकीत मोठी मजल मारली होती.
  • ठाकूर यांनी त्यावेळी तत्कालीन राज्यमंत्री असलेल्या शेकापच्या उमेदवार मीनाक्षी पाटील यांचा पराभव केला होता.
  • शेकापच्या गडाला सुरुंग लावण्याचं काम ठाकूर यांनी केलं होतं.
  • कारण जवळपास तीन दशकानंतर शेकापचा अलिबागमध्ये पराभव झाला होता.

नाना पटोलेंनी वाहिली श्रद्धांजली

- Advertisement -

अलिबाग उरण मतदारसंघाचे कॉंग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे आज दु:खद निधन झाले. झिरास ग्रामपंचायतीचे सरपंच ते आमदार अशा विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत त्यांनी लोकांना न्याय देण्याचे काम केले, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठाकूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

- Advertisement -