घरताज्या घडामोडीवरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंना मोठा धक्का; माजी नगरसेवकाचा शिंदे गटात प्रवेश

वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंना मोठा धक्का; माजी नगरसेवकाचा शिंदे गटात प्रवेश

Subscribe

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल अद्यापही वाजलेले नाहीयेत. परंतु महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदे गटाकडून ठाकरे गटाला धक्का देण्याचा प्रयत्न सुरु आहे. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना वरळी मतदारसंघात शिंदे गटाने मोठा धक्का दिला आहे. तो म्हणजे वरळीतील माजी नगरसेवक संतोष खरात यांनी ठाकरेंना रामराम ठोकत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला आहे.

पक्षात प्रवेश केल्यानंतर संतोष खरात यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, विकास होण्याकरीता मी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांचे काम अहोरात्र करताना मी पाहत आहे. लोकांची कामं होत आहेत. मला कुठलेही आश्वासन दिले नाही. एकनाथ शिंदे यांच्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात काम करणे हे माझ्यासाठी भाग्याचे आहे, असं संतोष खरात यांनी सांगितलं.

- Advertisement -

माझी कुणावरही नाराजी नाही. माझी एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली. त्यावेळी मी त्यांना सर्व सांगितलं. आपण एकत्र काम करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. त्यानंतर मी पक्षप्रवेश केला असल्याची माहिती खरात यांनी दिली.

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतचा प्रश्न निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. निवडणूक आयोगाकडे झालेल्या शेवटच्या सुनावणीनुसार आज दोन्ही गटांना लेखी युक्तिवाद सादर करायचा होता. त्यानुसार, उद्धव ठाकरे गटाने इमेलच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला उत्तर सादर केले आहे. तर, शिंदे गटाकडूनही शेवटच्या क्षणी उत्तर सादर करण्यात आले आहे. त्यामुळे पक्षचिन्ह आणि पक्षाचे नाव कोणत्या गटाला मिळणार?, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.

- Advertisement -

हेही वाचा : बाळासाहेबांच्या पक्षघटनेनुसारच शिंदेंना नेतेपद, राहुल शेवाळेंचे स्पष्टीकरण


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -