घरक्राइमएन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Subscribe

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याबाहेर सापडलेली स्फोटकांनी भरलेली कार आणि कारचे मालक मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएच्या ताब्यात असलेले एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रदीप शर्मा यांच्यासोबत संतोष शेलार आणि आनंद जाधव यांना देखील १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

प्रदीप शर्मा यांची १७ जून रोजी एनआयएच्या कोठडीत रवानगी करण्यात आली होती. आज त्यांची कोठडी संपणार होती. त्या अनुषंगाने आज न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने आज प्रदीप शर्मासह संतोष शेलार आणि आनंद जाधव यांना देखील १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. प्रदीप शर्मा यांनी विशेष कारागृहात पाठवा, अशी मागणी करणारा अर्ज न्यायालयात सादर केला होता. या अर्जावर तळोजा कारागृहातील प्रशासनानं अर्जाची योग्य ती दखल घ्यावी, असं म्हटलं.

- Advertisement -

मनसुख हिरेनच्या हत्येत मनीष सोनी आणि सतीश मोटकर यांचा जास्त सहभाग आहे. मनीष हत्येत वापरलेली गाडी चालवत होता. दोन्ही आरोपी या हत्या प्रकरणात महत्त्वाची माणसं आहेत, त्यामुळे आम्हाला तपास करायचा आहे. या प्रकरणात मोठा फंड विविध माध्यमातून जमा करण्यात आला. दोघांनी परदेशात प्रवास केल्याच्या काही लीडस मिळाल्या आहेत. काही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झालाय ते आम्हाला शोधायचे आहेत, असं एनआयएने सांगितलं. दरम्यान, मनीष सोनी आणि सतीश मुठेकरी या दोघांनाही १ जुलैपर्यंत NIA कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -