घरमहाराष्ट्रमाजी महापौर किशोरी पेडणेकर यांचे शिंदेंना भावनीक आवाहन

माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचे शिंदेंना भावनीक आवाहन

Subscribe

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केले आहे. विधान परिषदेच्या निकालानंतर ते आपल्यासोबत जवळपास 35 आमदारांना घेऊ गुजरातमध्ये गेले आहेत. एकनाथ शिंदे यांची समजूत घालण्याचे प्रयत्न शिवसेनेकडून सुरू आहेत. यावर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिंदे यांना भावनीक आवाहन केले आहे.

शिंदेसाहेब पुन्हा आपल्या घरी या, असे त्यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. शिवसेनेत सुरू असलेल्या अंतर्गत घडामोडींमुळे किशोरी पेडणेकर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी, प्रत्येक दहा वर्षांनी शिवसैनिकांना अशा गोष्टींना सामोरे जावे लागते. त्या वेदना आम्हाला आत्मक्लेश देतात. कालपासून ज्या पद्धतीने नाट्यमय घडामोडी घडत आहेत. त्याही आम्हाला आत्मक्लेश देणाऱ्या आहेत.

- Advertisement -

एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून विनंती – 

शिंदे साहेबांना काही सांगण्याएवढी मी मोठी नाहीये. पण एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून विनंती करेन, ज्या पद्धतीने महाराष्ट्रात भाजपाकडून गाजरे दाखवण्याचा कार्यक्रम सुरू आहे, त्याला कृपया बळी पडू नका. आपल्या घरी परत या, अशी भावनिक साद किशोरी पेडणेकर यांनी घातली आहे.

- Advertisement -

शिवसेनेचे हिंदुत्व दाखवून आणि मिरवून घेणारे नाही –

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, हिंदुत्व कोणीच सोडले नाही. शिवसेना कधीच हिंदुत्व सोडू शकत नाही. शिवसेनेचे हिंदुत्व हे दाखवून आणि मिरवून घेणारे नाही. सेनेचं हिंदुत्व हे मानणारं आहे. याचा अर्थ दुसऱ्याच्या धर्माला कमी लेखावं, असा नाही. बाळासाहेबांनी असं कधीही केलेलं नाही,” असंही त्या म्हणाल्या.

 

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -