Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरच्या माजी महापौरांचा शिवसेनेत प्रवेश, ठाकरे गटाला धक्का

छत्रपती संभाजीनगरच्या माजी महापौरांचा शिवसेनेत प्रवेश, ठाकरे गटाला धक्का

Subscribe

छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनी ट्वीट केले आहे.

छत्रपती संभाजीनगर : 13 महिन्यांपूर्वी राज्यातील महत्त्वाचा पक्ष असलेल्या शिवसेनेमध्ये उभी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये जून महिन्यात विधान परिषदेच्या निवडणुका होताच 40 आमदारांसह बंडखोरी केली. या घटनेमुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. ज्यानंतर या पक्षाला लागलेली गळती अद्यापही सुरूच आहे. महत्त्वाची बाब म्हणजे शिवसेना आता ही उद्धव ठाकरे यांची राहिली नसून ती आता एकनाथ शिंदे यांची झालेली आहे. कारण काही महिन्यांपूर्वी निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या स्वाधीन केलेले आहे. त्यामुळे मूळ शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचे सांगण्यात येते.

हेही वाचा – शरद पवारांचे निकटवर्तीय ईडीच्या रडारवर; जळगावातील राजमल लखिचंद ज्वेलर्सची झाडाझडती सुरू

- Advertisement -

ठाकरे गटाला धक्के देण्यापासून शिंदे गट अद्यापही मागे सरसावलेला नसल्याचे दिसून येत आहे. कारण सतत कोणी ना कोणी शिंदे गटात प्रवेश करून ठाकरे गटाला आणखी हादरे मिळत आहे. राज्यातील पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे या दोघींनी काही दिवसांच्या अंतराने शिंदे गटामध्ये प्रवेश केला. यानंतर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. त्यातच एकनाथ शिंदे गटाकडून आजही ठाकरे गटाला धक्का देण्याचे काम सुरुच आहे. नेहमीच ठाकरे गटातील पदाधिकारी असो किंवा नेते मंडळी असो ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये प्रवेश करताना दिसून येत आहे.

नुकतेच छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनी ट्वीट केले आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे ठाकरे गटातील माजी महापौर गजानन बारवाल, माजी शाखाप्रमुख सतीश माहोरे, विभागप्रमुख कन्हैया देवतवाल, गुड्डू बन्सीवाल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित केला. प्रवेश करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले. (Former mayor of Chhatrapati Sambhajinagar joins Shiv Sena)

- Advertisement -

याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ट्वीट करत लिहिले आहे की, #छत्रपती_संभाजीनगर महानगरपालिकेचे उबाठा गटाचे माजी महापौर गजानन बारवाल, माजी शाखाप्रमुख सतीश माहोरे, विभागप्रमुख कन्हैया देवतवाल, गुड्डू बसनीवाल यांनी आज #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी आमदार संजय शिरसाट, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ उपस्थित होते.

- Advertisment -