घरताज्या घडामोडीकॉंग्रेसच्या 'भारत जोडो यात्रेत' राहुल गांधींना आदित्य ठाकरेंची साथ

कॉंग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रेत’ राहुल गांधींना आदित्य ठाकरेंची साथ

Subscribe

कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा आज महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. महारष्ट्रातील नांदेड जिल्हातील देगलूर येथून भारत जोडो यात्रेला आज संध्याकाळपासून सुरूवात होणार आहे.

कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा आज महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. महारष्ट्रातील नांदेड जिल्हातील देगलूर येथून भारत जोडो यात्रेला आज संध्याकाळपासून सुरूवात होणार आहे. या यात्रेचे काँग्रेससह विविध राजकीय पक्ष, संघटनांकडून स्वागत जाणार असून, रात्री 9 वाजता पदयात्रा प्रारंभ होऊन वन्नाळीकडे प्रयाण करणार आहे. विशेष म्हणजे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत माजी मंत्री आणि ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे देखील सहभागी होणार आहेत. (Former minister Aditya Thackeray will participate in Congress leader Rahul Gandhi Bharat Jodo Yatra)

9 नोव्हेंबरला नांदेड येथे आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. आदित्य ठाकरेंसह ठाकरे गटातील काही खासदार आणि आमदार देखील या यात्रेत सहभाग घेणार आहेत. याबाबत महाविकास आघाडीने तयारीही सुरु केली असल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

भारत जोडो यात्रेत पहिल्यांदाच रात्री मशाल यात्रा निघणार आहे. 8 नोव्हेंबरला शीख धर्माचे संस्थापक श्री गुरुनानक देवजी यांची जयंती आहे. त्यामुळे रात्री 12 वाजता गुरुद्वारात जाऊन खासदार राहुल गांधी हे दर्शन घेणार आहेत, अशी माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. नांदेड, हिंगोली, वाशीम,अकोला आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यातून 14 दिवस ही यात्रा तब्बल 384 किलोमीटरचा प्रवास करणार आहे.

महाराष्ट्रात अशी निघणार ‘भारत जोडो यात्रा’

- Advertisement -
  • नांदेडमध्ये 4 आणि हिंगोली जिल्ह्यात 4 दिवस मुक्काम करून विदर्भात वाशिममधून मार्गक्रमण करेल.
  • नांदेड जिल्ह्यातील पहिला मुक्काम देगलूर येथे राहील.
  • मंगळवारचा मुक्काम शंकरनगर रामतीर्थ
  • बुधवारी-वझिरगाव फाटा
  • गुरुवार- पिंपळगाव महादेव
  • शुक्रवारी पहाटे हिंगोली जिल्ह्याकडे रवाना होणार आहे.

हेही वाचा – खोटा इतिहास मांडण्याची परंपरा पुरंदरेंनी सुरू केली; राष्ट्रवादीचा संभाजीराजे छत्रपतींना पाठींबा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -