जळगाव : जळगाव जिल्ह्यातील अमळनेरचे माजी आमदार गुलाबराव पाटील यांचे निधन झाले आहे. गुलाबराव पाटील यांनी वयाच्या 90 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गुलाबराव पाटील यांना आज दुपारी दोन वाजता त्यांच्यावर अमळनेर तालुक्यातील मुळगावी दहीवद येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे. गुलाबराव पाटील त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.
जनता दलाचे आमदार म्हणून गुलाबराव पाटील हे तीन वेळा निवडून आले होते. गुलाबराव पाटील हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे आमदार म्हणून ओळखले जात होते. गुलाबराव पाटील हे समाजवादी विचारसरणीचे नेते होते. गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
गुलाबरावर पाटील हे 1978 मध्ये पहिल्यांदा पुलोद सरकारच्या काळात अमळनेर मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आले होते आणि तीन वेळा आमदार म्हणून गुलाबराव पाटील निवडून आले होते. सर्वप्रथम गुलाबराव पाटील हे सुरुवातीला लोकल बोर्डात निवडून आले होते.
हेही वाचा – शरद पवारांच्या कोल्हापुरातील सभेवर अजित पवारांनी व्यक्त केले मत, म्हणाले…
विधानसभेतील बुलंद आवाज हरपला
गुलाबराव पाटील यांच्या निधनावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली. अजित पवारांनी ट्वीटमध्ये म्हणाले, “अमळनेर तालुक्याचे माजी आमदार गुलाबराव वामनराव पाटील यांच्या निधनानं सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारा, त्यासाठी विधानसभेत उठणारा बुलंद आवाज हरपला आहे. राजकारणापलीकडे मैत्री जपणारं एक मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!”
अमळनेर तालुक्याचे माजी आमदार गुलाबराव वामनराव पाटील यांच्या निधनानं सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारा, त्यासाठी विधानसभेत उठणारा बुलंद आवाज हरपला आहे. राजकारणापलीकडे मैत्री जपणारं एक मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/QwbMWtFoky
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) August 23, 2023