घरताज्या घडामोडीवावरे, डॉ. पवार, अ‍ॅड. ढिकलेंचे साथीदार माधवराव पाटील अनंतात विलीन

वावरे, डॉ. पवार, अ‍ॅड. ढिकलेंचे साथीदार माधवराव पाटील अनंतात विलीन

Subscribe

माजी खासदार तथा जनलक्ष्मी बँकेचे संस्थापक माधवराव पाटील यांचे रविवारी (दि.१४) निधन झाले. ते ८२ वर्षाचे होते. प्रकृती अस्वस्थामुळे गेल्या दीड महिन्यांपासून त्यांच्यावर अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. माजी महापौर स्व. शांताराम बापू, माजी खासदार स्व. डॉ. वसंतराव पवार, माजी खासदार स्व. अ‍ॅड. उत्तमराव ढिकले यांचे निकटवर्तीय म्हणून एकेकाळी ओळख असलेले माधवराव आपल्या मित्रांनाच जणू भेटायला गेले अशी प्रतिक्रिया त्यांच्या निधनानंतर शहरातून व्यक्त होत आहे. माजी नगरसेवक उत्तमराव कांबळे यांनीही आपला जवळचा मित्र गमवल्याची चर्चा सुरु आहे.

माजी खासदार तथा जनलक्ष्मी बँकेचे संस्थापक माधवराव पाटील यांचे रविवारी (दि.१४) निधन झाले. ते ८२ वर्षाचे होते. प्रकृती अस्वस्थामुळे गेल्या दीड महिन्यांपासून त्यांच्यावर अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. माजी महापौर स्व. शांताराम बापू, माजी खासदार स्व. डॉ. वसंतराव पवार, माजी खासदार स्व. अ‍ॅड. उत्तमराव ढिकले यांचे निकटवर्तीय म्हणून एकेकाळी ओळख असलेले माधवराव आपल्या मित्रांनाच जणू भेटायला गेले अशी प्रतिक्रिया त्यांच्या निधनानंतर शहरातून व्यक्त होत आहे. माजी नगरसेवक उत्तमराव कांबळे यांनीही आपला जवळचा मित्र गमवल्याची चर्चा सुरु आहे.
सामाजिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रात दबदबा असलेले माधवराव हे नाशिक जिल्ह्यासाठी सर्वपरिचीत नेते होते. १९९८ आणि २००२ साली लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी केली होती. त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या पंचवटीतील निवासस्थानापासून सकाळी निघाली. गणेशवाडी अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुली, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

नम्र आणि मृदू स्वभावाचे माधवराव :

१९७९ मध्ये माधवराव पाटील यांनी जनलक्ष्मी नागरी सहकारी बँकेची स्थापना केली. गेल्या चाळीस वर्षांपासून ते या बँकेचे संचालक होते. या बँकेचे ते संस्थापक होते. या बँकेच्या माध्यमातून नाशिकमधील सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्थांना मोठी मदत मिळाली. याशिवाय शिखर बँकेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. कांदा, बटाटा भवन आणि अन्य सहकारी संस्थांवर देखील त्यांनी कामकाज केले होते. सर्वसामान्य नागरिकांना जनलक्ष्मी बँकेच्या माध्यमातून दिलासा देण्याचे मोठे काम त्यांनी केले होते. तसेच खरेदी विक्री संघाचा धुराही त्यांनी अनेक वर्ष सांभाळला होता. नाशिकमधील प्रसिद्ध वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते.
नम्र आणि मृदू स्वभाव ही माधवराव पाटील यांची ओळख होती. अगदी विरोधकही त्यांना ‘गोड बोलणारे माधवराव’ याच स्वभावाने ओळखत. माजी मंत्री पुष्पाताई हिरे यांच्यासोबत त्यांनी काम केले होते. पुष्पाताईंना उलट उत्तरे देणारी व्यक्ती चालत नव्हती. त्यांच्या सहवासात माधवरावांचा कुणालाही उलट उत्तर न देण्याचा स्वभाव बनला. १९९७ च्या दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे राजाभाऊ गोडसे खासदार होते. १९९८ ला लोकसभा निवडणूक लागली. माधवराव काँग्रेसकडून उभे राहिले. त्यावेळी नाशिक लोकसभा मतदार संघाची भौगोलिक रचना ही काँग्रेसला अधिक अनुकूल होती. नाशिकच्या अंजनेरीपासून सुरु होणारा १४० किलोमीटरचा मतदार संघ, देवळाली, सिन्नर, निफाड, येवला, अकोला ते पार आळे फाट्यापर्यंत पोहचला होता. नगर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. त्याचा फायदा नाशिक जिल्ह्यातील काँग्रेसला अपसूकच मिळत असे. त्यावेळी अकोले येथे झालेल्या एका सभेत एका शेतकर्‍याने केलेले भाषण बरेच गाजले. खास शैलीत जय शिवाजी, जय भवानी अन् टाक माझी खंडणी’, शिवसेनेच्या सरकारचे त्या शेतकर्‍याने केलेले हे वर्णन वेगाने सगळीकडे पसरले. यात १९९८ च्या निवडणुकीत सेनेच्या राजाभाऊ गोडसेंना चितपट करुन नाशिकला माधवराव पाटील मोठ्या फरकाने निवडून आले. या निवडणुकीत माधवरावांना सर्वाधिक मदत झाली ती तत्कालीन आमदार डॉ. वसंतराव पवार, माजी महापौर शांताराम बापू आणि माजी नगरसेवक उत्तमराव कांबळे यांची. या प्रचारादरम्यानच शांताराम बापू यांना हार्ट अ‍ॅटॅक आला. त्यांना कॉलेजरोडवरील व्हिजन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दुर्देवाने तेथे उपचार सुरु असतानाच त्यांचे निधन झाले. खासदारकी मिळाली पण जीवलग मित्र, मार्गदर्शक सोडून गेल्याची चुटपूट माधवरावांना लागून राहिली. या आठवणींनी माधवराव अखेरपर्यंत अस्वस्थ होते.
काही दिवसांपूर्वीच खानदेश मराठा मंडळ आयोजित छत्रपती राजश्री शाहू पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी माधवराव पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच पंचवटीत सुमारे ९.५ कोटी रुपये खर्चाच्या विकास कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला होता.

- Advertisement -

 

 

वावरे, डॉ. पवार, अ‍ॅड. ढिकलेंचे साथीदार माधवराव पाटील अनंतात विलीन
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -