घरताज्या घडामोडीST Workers Protest: सिल्व्हर ओक हल्ल्यावर निलेश राणेंची बोचरी टीका, आयुष्यभर घाणेरडं...

ST Workers Protest: सिल्व्हर ओक हल्ल्यावर निलेश राणेंची बोचरी टीका, आयुष्यभर घाणेरडं राजकारण केल्यावर…

Subscribe

एसटी विलीनीकरणाच्या मागणीवरून आक्रमक झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत दगडफेक आणि चप्पलफेक केली. ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे महाविकास आघाडीतील नेतेमंडळी म्हणत आहेत. या पार्श्वभूमीवरून भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी ट्वीट करून बोचरी टीका केली आहे.

‘पवार साहेब आता तरी सन्यास घ्या, गप घरी बसा’

निलेश राणे आंदोलनचा व्हिडिओ ट्वीट करत म्हणाले की, ‘काय उपयोग 50 वर्ष राजकारणात असून? सामान्य लोकं घरावर चप्पल आणि दगडी घेऊन आले. आयुष्भर घाणेरडे राजकारण केल्यावर काय परिणाम होतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ. पवार साहेब आता तरी सन्यास घ्या, गप घरी बसा.’

- Advertisement -

‘एसटी कर्मचाऱ्यांच्या भावनांचा ‘राजकीय’ वापर करून त्यांना भडकविण्याचे काम’

एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनावर आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, ‘एसटी कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्या महाविकास आघाडी सरकारने मान्य केलेल्या आहेत. न्यायालयानेही नुकताच तसा निर्णय दिला असतानाही आज शरद पवारांच्या निवासस्थानी घडलेला प्रकार दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या भावनांचा ‘राजकीय’ वापर करून त्यांना भडकविण्याचे काम होते आहे, हे अत्यंत चुकीचे आहे. महाराष्ट्राची सामाजिक आणि राजकीय संस्कृती दूषित करण्याचे काम काही लोकांकडून जाणीवपूर्वक केले जात आहे.’

- Advertisement -


हेही वाचा – ST Workers Protest: शरद पवारांच्या घराबाहेरील आंदोलनामागे अज्ञात शक्तीचा हात – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -