Wednesday, February 17, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र ९४ वे भारतीय मराठी साहित्य संमेलन: अखेर समन्वयकपदी समीर भुजबळ

९४ वे भारतीय मराठी साहित्य संमेलन: अखेर समन्वयकपदी समीर भुजबळ

Related Story

- Advertisement -

मार्च अखेरीस नाशिकमध्ये पार पडणाऱ्या ९४ व्या भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समन्वयकपदी अखेर माजी खासदार समीर भुजबळ यांची नियुक्ती झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून साहित्य संमेलनाच्या पद निश्चितीवरुन चर्चा रंगत होत्या. त्यानंतर विविध समित्यांच्या नियुक्त नुकत्याच जाहीर झाल्या. परंतु या नियुक्त्तांवेळी नियोजनामध्ये मोलाचे काम करणाऱ्या समीर भुजबळ यांचेच नाव राहून गेले. विविध समित्यांच्या नियुक्त्यांवेळी नाव राहून गेल्याने समीर भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली होती. संमेलन कार्यात सक्रिय असलेले समीर भुजबळ अधिकृतपणे समन्वयकपद मिळाल्याने आणखी जोमाने कामाला लागले आहेत. स्वागताध्यक्षपदी पालकमंत्री छगन भुजबल यांचे नाव जाहीर झाल्यानंतर आयोजकांनी आपासांत पदे वाटून घेतले.

परंतु यात समीर भुजबल यांचे नावच राहून गेले होते. साहित्य महामंडळाने लोकहितवादी मंडळाच्या नियमावलीत जबाबदारी नसताना कोणताही राजकीय व्यक्ती संमेलनाच्या कार्यात येऊ नये असे सांगितले होते. परंतु छगन भुजबळ यांना स्वागताध्यक्षपद देण्यात आल्याने समीर भुजबळ यांच्या पदभाराचा मार्ग मोकळा झाला होता. तरीही समीर भुजबळ यांना कोणताही पद वा जबाबदारी सोपावण्यात आली नव्हती. कोणताही पदभार नसल्याने आपण टीकेचे धनी होऊ शकतो त्यामुळे आपली खदखद त्यांनी कार्यकारणीजवल बोलून दाखविली. स्वागताध्यक्षांचे नाव जाहीर झाल्यानंतर काही पदाधिकाऱ्यांची नेमणूक झालेली यादी समीर भुजबळांना दाखवण्यात आलीय त्यावेळी या यादीत आपले नावचं नाही हे पाहून समीर भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. याप्रसंगी आयोजकांना समीर भुजबळ यांचे नाव कुठे टाकावे असा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर आयोजकांनी यात तोडगा काढून समीर भुजबळांना संमेलनाच्या समन्वयकपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे साहित्य महामंडळाच्या नियमावतही समीर भुजबळ यांची जबाबदारी बसेल आणि संमेलानाची कामेदेखील होतील. असा आयोजकांचे म्हणणे आहे.


- Advertisement -

हेही वाचा- पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी ऑडिओची सखोल चौकशी करा – फडणवीस


 

- Advertisement -