घरताज्या घडामोडीकुख्यात गुंड गजा मारणे रॅली प्रकरणात माजी खासादर संजय काकडेंना जामीन

कुख्यात गुंड गजा मारणे रॅली प्रकरणात माजी खासादर संजय काकडेंना जामीन

Subscribe

गजा मारणेच्या जंगी मिरवणुकीसाठी माजी खासदार संजय काकडे यांनी गाड्या पुरवल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती.

कुख्यात गुंड गजा मारणेला निर्दोष मुक्त केल्यानंतर गजा मारणेच्या समर्थकांनी ३०० ते ५०० अलिशान गाड्यांनी थाटामाटात मिरवणूक काढली होती. या मिरवणूकीदरम्यान कोरोनाचे नियम आणि वाहतुक नियमांना धाब्यावर बसवण्यात आले होते. परंतु या मिरवणुकीसाठी भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी गाड्या पुरवल्या असल्याचा आरोपामुळे पुणे पोलिसांनी अटक केली होती. शिवाजीनगर न्यायालयात काकडे यांना सादर करण्यात आल्यानंतर त्यांना न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. संजय काकडेंनी गजा मारणेच्या रॅलीसाठी गाड्या पुरवल्या असल्याची माहिती पुणे पोलिसांनी मिळाली होती. या माहितीच्या आधारे पुणे पोलिसांनी संजय काकडे यांना अटक केली होती.

काय आहे प्रकरण

पुण्यातील अमोल बधे आणि पप्पू गावडे यांच्या हत्या प्रकरणातून गजा मारणे याची निर्दोष मुक्तता झाली. यावेळी गजा मारणेच्या समर्थकांनी नवी मुंबई येथील तळोजा कार्यालयाच्या बाहेर तोबा गर्दी करत जंगी स्वागत केले होते. यानंतर गजा मारणेची ३०० ते ५०० गाड्यांनी जंगी मिरवणूक काढण्यात आली होती. मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांची गर्दी झाल्याने वाहतूकीचे नियम पायदळी तुडवण्यात आले तसेच टोलही चुकवल्यामुळे गजा मारणेवर पुन्हा कारवाई करुन अटक करण्यात आली. परंतु गजा मारणेच्या जंगी मिरवणुकीसाठी माजी खासदार संजय काकडे यांनी गाड्या पुरवल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती.

- Advertisement -

पुणे पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे संजय काकडे यांना बुधवारी सकाळी अटक करण्यात आली. यानंतर त्यांना पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात सादर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने संजय काकडे यांना २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -