घरमहाराष्ट्रपक्षातील एकही महिला मंत्रिपदासाठी लायक नाही का? पेडणेकरांचा खोचक सवाल

पक्षातील एकही महिला मंत्रिपदासाठी लायक नाही का? पेडणेकरांचा खोचक सवाल

Subscribe

एका महिलेने ज्या व्यक्तीमुळे आत्महत्या केली. त्या व्यक्तीला मंत्रीमंडळात घेण्यात आले आहे. यांच्या पक्षात दोन तीन महिला उरल्या आहेत. त्यापैकी एकही महिला मंत्रिपदासाठी लायक नाही का?”

शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतरही मंत्र्यांचा शपथविधी झाला नव्हता. कोणाला कोणतं खातं मिळणार, कोणाला मंत्रिपदी संधी मिळणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं. आज-उद्या म्हणत अखेर आज मंत्र्यांनी गोपनियतेची शपथ घेतली आहे. तर, थोड्याच वेळात खातेवाटपही जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिंदे-फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे यांच्या पक्षातील एकही महिला मंत्रिपदासाठी लायक नाहीत का असा खोचक सवाल मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी विचारला आहे. तसेच, त्यांनी संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या मंत्रिपदावरूनही भाजपावर टीकास्त्र सोडलं. (Former mumbai mayor kishor pednekar ask questioned to bjp about not involving lady mla in the cabinet)

हेही वाचा – महिलेला मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानंतर सुप्रिया सुळे आणि यशोमती ठाकूर यांची सरकारवर टीका

- Advertisement -

किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, “बोल गया सबकुछ लेकींन याद नही अब कुछ, अशी या सरकारची परिस्थिती आहे. आम्ही किती संवेदनशील आहोत, याचं एक चित्र निर्णाण केलं गेलं होतं. मात्र, आता तो भोपळा फुटला आहे. यांच्या मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान देण्यात आलेलं नाही. मात्र, एका महिलेने ज्या व्यक्तीमुळे आत्महत्या केली. त्या व्यक्तीला मंत्रीमंडळात घेण्यात आले आहे. यांच्या पक्षात दोन तीन महिला उरल्या आहेत. त्यापैकी एकही महिला मंत्रिपदासाठी लायक नाही का?”

“पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्याच राठोडांना मंत्री करण्यात आलंय. त्यावेळी भाजपानेही रान उठवलं होतं. चित्रा वाघ यांनी तर आभाळ-पाताळ एक केलं होतं. तेव्हा बडबड करणारे पोपट आता कुठे गेले,” असा सवालही पेडणेकरांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – संजय राठोडांवर भाजपा नेत्यांनी केली होती टीका; सोमय्या, फडणवीसांचा जुना व्हिडीओ व्हायरल

याच मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसच्या नेत्या, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

आमच्याकडून गेलेल्या अनेक लोकांना या मंत्रिमंडळात जागा मिळाली आहे. त्याबद्दल मला खूप आनंद झाला आहे. या मंत्रिमंडळात आमच्या बरोबरचे आणि विचारांचे काम करणारे अनेक चेहरे दिसताहेत. त्यामुळे मला खूप आनंद आणि समाधान वाटलं. 18 मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यामध्ये एकाही महिलेला मंत्रिमंडळात स्थान न मिळणं हे खूप दुर्दैव आहे. या देशातील महिलांची लोकसंख्या 50 टक्के इतकी आहे. त्यामुळे 18 पैकी एकाही महिलेला मंत्रिमंडळात स्थान न देणं हे खेदजनक आणि आश्चर्य वाटण्यासारखं आहे.

मंत्रिमंडळ विस्तार म्हणजे एक जोक – यशोमती ठाकूर

सुप्रिया सुळे यांच्यानंतर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी महिलेला मंत्रिमंडळात स्थान न दिल्याबाबत टीका केली आहे. मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान देण्यात आलेलं नाही. हा मंत्रिमंडळ विस्तार म्हणजे एक जोक आहे, अशी खिल्ली यशोमती ठाकूर यांनी उडवली आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -