Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचे निधन

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचे निधन

साताऱ्यातील त्यांचे मुळ पुसेगावात होणार अंत्यसंस्कार

Related Story

- Advertisement -

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचे वयाच्या ७४ वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ह्रदयासंबंधीत आजारामुळे त्यांच्यावर अपोलो रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात त्यांनी एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. आज साताऱ्यातील पुसेगाव या ठिकाणी त्यांचे अंत्यविधी केले जाणार आहे.

पोलीस दलात एक शिस्तप्रिय, कडक अधिकारी म्हणून धनजंय जाधव यांची ओळख होती. धनंजय जाधव यांचा जन्म सातारा पुसेगावात १९४७ साली झाला. याच गावात त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले तर माध्यमिक शिक्षण वाईतून पूर्ण केले. यानंतर त्यांनी एमएससी हे पदव्युत्तर पदवी घेत. यानंतर ते रायगडला शिक्षणाधिकारी म्हणून काम करु लागले. दरम्यान १९७२ साली त्यांनी युपीएससी स्पर्धा परीक्षा उतीर्ण होत महाराष्ट्र पोलिस दलात प्रवेश केला. यानंतर त्यांनी धुळे जिल्ह्यात आयपीएस अधिकारी म्हणून काम पाहिले. यापाठोपाठ वर्धा, नगर, पुणे महामार्ग या ठिकाणी ते पोलीस अधिक्षक पदावर केले. काही काळानंतर कोल्हापूर परिक्षेत्रात विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान पुण्यात पोलीस उपायुक्त म्हणून जबाबदारी पार पाडल्यानंतर धनंजय जाधव यांनी 2004 ते 2007 या काळात पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून काम पाहिलं. त्यानंतर त्यांची नियुक्ती मुंबई येथे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून करण्यात आली. व त्यानंतर त्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून काम पाहिले. 2007 ते 2008 या काळात या पदावर काम करतान त्यांची निवृत्त झाली.

- Advertisement -

निवृत्तीनंतरही त्यांनी एमपीएससी बोर्डासाठी दोन वर्षे काम केले. याचदरम्यान त्यांनी आपल्या मुळे पुसेगावात शिक्षण संस्था सुरु केली. शेती करत त्यांनी या शिक्षण संस्थेचे काम पाहिले. सामाजिक कार्याच्या जाणिवेतून त्यांनी राजकारणा पाहून दूर राहणे पसंत केले. अनेक पक्षांच्या ऑफर त्यांनी नाकारल्या. पोलिस दलातील उत्कृष्ट सेवेसाठी धनंजय जाधव यांचा १९९२ साली राष्ट्रीय पोलीस पदकाने गौरवण्यात आले. तर तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांनी स्वातंत्र्यदिनी पोलीस पदक देऊन जाधव यांचा सन्मान केला. त्याचवर्षी राज्याचे पोलीस महासंचाकांनी उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मान चिन्ह देत धनंजय जाधव यांचा सन्मान केला होता.


 

- Advertisement -