घरमहाराष्ट्रफोन टॅपिंग प्रकरण: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना 9 दिवसांची ईडी...

फोन टॅपिंग प्रकरण: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना 9 दिवसांची ईडी कोठडी

Subscribe

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना नॅशनल स्टॉक एक्सचेंज फोन टॅपिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आले आहे. यानंतर आज न्यायालयाने त्यांना 9 दिवसांची ईडी कोठडी सुनावली. याशिवाय माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना आणखी एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. संजय पांडे यांची ईडी अधिकाऱ्यांकडून 19 जुलैला चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आले.

सीबीआयकडून चौकशी –

- Advertisement -

याआधी संजय पांडे यांची सोमवार आणि मंगळवारी सीबीआयकडून चौकशी करण्यात आली होती. परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचा आरोप कले होता. त्यानंतर सीबीआयकडून संजय पांडेंची चौकशी करण्यात आली.याशीवाय एनएसई कंपनीतील घोटाळा प्रकरणात त्यांची चौकशी झाली.

आयटी ऑडिट कंपनीची स्थापना –

- Advertisement -

संजय पांडेंनी 2001 मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नव्हता. त्यानंतर त्यांनी आयटी ऑडिट कंपनी सुरू केली होती. काही काळानंतर ते पोलीस सेवेत पुन्हा रुजू झाले. त्यांनी आपल्या कंपनीच्या संचालक पदावर मुलाला बसवले. संजय पांडे यांनी स्थापन केलेल्या कंपनीला 2010 ते 2015 याकाळात एनएसईच्या सर्व्हर आणि सिस्टम सुरक्षेशी संबंधित करार देण्यात आला होता. याच प्रकरणात मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली त्यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. पीएमएलए या कायद्यांतर्गत त्यांची चौकशी सुरू आहे.

निवृत्ती आणि अटक –

मुंबई पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी संजय पांडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे संचालक होते. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक पदाची जबाबदारी सरकारने सोपवली. आपीएस रजनीश सेठ यांना महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक पद मिळाल्यानंतरही जबाबदारी त्यांच्याकडून काढून घेण्यात आली. त्यानंतर ते मुंबईचे पोलीस आयुक्त झाले. 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी संजय पांडे मुंबईचे 76 वे पोलिस आयुक्त होते. त्यांनी हा पदभार आयपीएस हेमंत नागराळे यांच्याकडून घेतला होता. 30 जून रोजी पोलीस सेवेतून निवृत्त झाल्यानंतर 19 जुलैला त्यांना अटक करण्यात आली.

 

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -