मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना ईडीचे समन्स, 5 जुलैला चौकशी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने समन्स बजावले आहे. त्यांना 5 जुलैला ईडीने चौकशीसाठी बोलवले आहे.

ED summons ex-Mumbai Police Commissioner Sanjay Pandey in NSE co location case

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने समन्स बजावले आहे. त्यांना 5 जुलैला ईडीने चौकशीसाठी बोलवले आहे. 30 जून रोजी मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन संजय पांडे निवृत्त झाले होते. निवृत्त झाल्यावर त्यांना तीन दिवशात ईडीने नोटीस पाठवली आहे.

आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी एका जुन्या प्रकरणाचा ईडीकडून तपास सुरू असताना मुंबईचे माजी आयुक्त संजय पांडे यांचे नाव समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर ईडीने त्यांना चौकशीसाठी समन्स जारी केला आहे. ५ जुलै रोजी सकाळी साडे अकरा वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.

या प्रकरणात आली नोटीस –

संजय पांडे ज्यावेळी DG होते, तेव्हा त्यांनी परमबीर सिंह यांना अनिल देशमुख यांच्या विरोधात माघार घेण्यासाठी दबाव निर्माण केला होता. तसेच NSE सर्वर कंप्रमाइज केस प्रकरणात त्यांना समन्स बजावण्या आला आहे. चित्र रामकृष्णा प्रकरणात एक ऑडिट कंपनी तयार करण्यात आली होती, ही कंपनी संजय पांडे यांची होती. या दोन्ही प्रकरणी संजय पांडे यांना ईडीने नोटीस बजावण्यात आली आहे.