माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचं निधन

भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८९व्या वर्षी त्यांनी पुण्यातील केईएम रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

Former President Pratibha Patil's husband Devisingh Shekhawat passed away

भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे निधन झाले आहे. ते ८९ वर्षांचे होते. पुण्यातील केईएम रुग्णालयात देवीसिंह शेखावत यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी प्रतिभाताई पाटील, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. देवीसिंह शेखावत यांच्यावर आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. शेखावत यांच्या निधनावर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहेत.

माजी आमदार देविसिंह शेखावत यांनी आज सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतल्याचे सांगण्यात येत आहे. देविसिंह शेखावत यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना दोन दिवसांपूर्वीच पुण्यातील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र वयोमानामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली होती. ते उपचाराला प्रतिसाद देत नव्हते. पण अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

हेही वाचा – रश्मी ठाकरेंच्या अडचणीत वाढ?; ‘त्या’ १९ बंगल्यांप्रकरणी अखेर गुन्हा दाखल

अगदी सुरुवातीला देवीसिंह शेखावत यांनी रसायन शास्त्राचे प्राध्यापाक म्हणून काम केले होते. 1972 मध्ये मुंबई विद्यापीठाने त्यांना पीएचडी दिली. विद्या भारती शिक्षण संस्था या त्यांच्या संस्थेचेही त्यांच्याकडून काम पाहण्यात येत होते. त्यांनी आपल्या राजकारणाच्या प्रवासाला काँग्रेस पक्षातून सुरुवात केली. 7 जुलै 1965 साली देवीसिंह शेखावत यांनी प्रतिभा पाटील यांच्याशी लग्नगाठ बांधली. त्यावेळी शेखावत हे अमरावतीचे महापौर होते. तसेच 1995च्या विधानसभा निवडणुकीत देवीसिंह शेखावत यांना विधानसभेच्या निवडणुकीत मोठा पराभव झाला ज्यामुळे त्यांचे डिपॉझिट सुद्धा जप्त झाले होते. राजकारणासोबतच ते सामाजिक कार्यात देखील सक्रिय होते.