घरताज्या घडामोडीमुंबई पालिकेच्या अधिकाऱ्याला धक्काबुक्की, शिवसेनेच्या नगरसेवकाला पोलिसांकडून अटक

मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्याला धक्काबुक्की, शिवसेनेच्या नगरसेवकाला पोलिसांकडून अटक

Subscribe

मुंबई महापालिकेच्या एका अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याप्रकरणी शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला पोलिसांनी अटक केली आहे. घाटकोपरमधील शिवसेनेचे माजी नगरसेवक किरण लांडगे यांना अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण वर्षभरापूर्वीचं आहे. परिसरात पाणी येत नसल्यामुळे लांडगे यांनी अधिकाऱ्याला धक्काबुक्की केली होती. त्यामुळे आता वर्षभरानंतर न्यायालयाच्या आदेशाने विनोबा भावे नगर पोलिसांनी लांडगे यांना अटक केली आहे. त्यांच्या अटकेनंतर समर्थकांनी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केले होते.

घाटकोपरच्या असल्फा परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे पाण्याच्या त्रासाने वैतागून गेलेल्या नागरिकांनी किरण लांडगे यांच्याकडे जाऊन ही समस्या त्यांच्यासमोर मांडली होती. ही समस्या लक्षात घेऊन लांडगे यांनी त्वरित मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्याची घेट घेतली. यादरम्यान लांडगे आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यामुळे लांडगे यांच्याविरोधात विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

- Advertisement -

दरम्यान, वर्षभरानंतर न्यायालयाच्या आदेशाने पोलिसांनी किरण लांडगे यांना अटक केली आहे. लांडगे यांच्या अटकेची माहिती मिळताच नागरिकांनी घाटकोपर परिसरात रास्तारोको केलं. तसेच नागरिकांनी विनोबा भावे नगर पोलीस ठाण्याबाहेर एकत्र येऊन निदर्शने केली.


हेही वाचा : आमच्या मुलांनी कुठे लग्न करावं…; ‘लव्ह जिहाद’मुद्द्यावरून सुप्रिया सुळेंचा भाजपावर हल्लाबोल

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -