शिवसेनेचे माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडेंना 2 वर्षांची शिक्षा

शिवसेनेच माजी क्रीडा राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांना न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड सुनावला. शासकीय कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणात गावडे यांनी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

Gulabrao Gawande

शिवसेनेच माजी क्रीडा राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांना न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड सुनावला. अकोला येथील अग्रेसन चौकात तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांशी वाद घातला होता. यामुळे शासकीय कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणात गावडे यांनी शिक्षा ठोठावण्यात आली.गुलाबराव गावंडे हे सध्या सेनेत नाहीत. ते आता राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आहेत.

काय घडले होते –

अकोला शहरातील अग्रसेन चौकात वाहतूक पोलीस कर्तव्यावर होते. वाहतूक पोलिस कर्मचारी संतोष गिरी यांनी गावंडे यांचे वाहन थांबविले. ही घटना 16 डिसेंबर 1999 रोजी घडली. गुलाबराव गावंडे यांनी वाहन थांबवल्याच्या कारणावरून पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घातली. तसेच शिविगाळ केल्याची घटना घडली होती.

गुन्हा दाखल –

या प्रकरणी पोलीस कर्मचारी संतोष गिरींच्या तक्रारीवरून रामदासपेठ पोलिसांनी सेनेचे चौघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये तत्कालीन क्रीडा राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांच्यासह राजू मधुकर मेतकर, गजानन नामदेव बचे, हरिनारायण रामराव गावंडे यांचा समावेश होता. या प्रकरणातील सुनावणीनंतर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. डी. गव्हाणे यांनी सबळ पुरावे आणि साक्षीदार तपासले.

तीघांची सुटका –

माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांना कलम 353 अन्वये दोन वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच पाच हजार रुपये दंड व कलम 294 अन्वये 2000 रुपये दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील इतर आरोपी असलेल्या तिघांना पुराव्याअभावी न्यायालयाने सुटका केली आहे. सरकारतर्फे अॅड. दीपक गोटे यांनी काम पाहिले.