घरताज्या घडामोडीशिवसेनेच्या माजी आमदाराचा 'वंचित'मार्गे भाजपमध्ये प्रवेश

शिवसेनेच्या माजी आमदाराचा ‘वंचित’मार्गे भाजपमध्ये प्रवेश

Subscribe

बुलढाणा मतदारसंघात तीन टर्म शिवसेनेचे आमदार राहिलेले विजयराज शिंदे यांनी आज आपल्या समर्थकांसह विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश घेतला.
विजयराज शिंदे हे तीन टर्म शिवसेनेचे आमदार होते. दरम्यान २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना निवडणुकीचे तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली होती. मात्र वंचित बहुजन आघाडीमध्ये शिंदे आणि त्यांच्या समर्थकांना घुसमट वाटू लागल्यामुळे त्यांनी भाजप पक्षात प्रवेस करण्याचा निर्णय घेतला.

कोण आहे विजयराज शिंदे?

बुलढाण्यातील कट्टर शिवसैनिक म्हणून विजयराज शिंदे यांची ओळख होती. तालुका प्रमुख ते बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे तीन वेळा आमदार होण्याचा मान त्यांनी मिळवला. सुरुवातीला नगरसेवक या पदापासून सुरुवात करत त्यांनी १९९५ रोजी पहिल्यांदा विधानसभेत पाऊल ठेवले. त्यानंतर २००४ आणि २००९ असा सलग दोनदा याच मतदारसंघातून विजय मिळवला. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे तिकीट कापून शिवसेनेने संजय गायकवाड यांना उमेदवारी दिली. त्यानंतर शिंदे यांनी बंडखोरीचा पवित्रा घेत वंचितकडून निवडणूक लढवली होती.

- Advertisement -

आज शिंदे भाजपमध्ये प्रवेश घेत असताना भाजपचे माजी मंत्री संजय कुटे, जिल्हाअध्यक्ष आकाश फुंडकर, आमदार श्वेता महाले, योगेंद्र गाडे हे उपस्थित होते. तर शिंदेसोबत माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव येवले, अर्जूनराव दांडगे, शिवसेना महिला आघाडी प्रमुख सिंधुताई खेडेकर, श्रीकृष्ण मोरे, कांताबाई राजगुरे, तुकाराम राठोड, पुरूषोत्तम नारखेडे, पुरूषोत्तम नारखेडे, पुरूषोत्तम लखोटिया, मा. सोफियान भाई, राजेश सुरपाजने, गणेशराव पाटील, संजय नागवंशी, सचिन शेळके, सुनील काटेकर, अशोक किन्हळकर, रहिम शाह, समाधान राऊत या नगरसेवक, सरपंच, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आजी, माजी सदस्यांनी सुद्धा यावेळी भाजपात प्रवेश केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -