शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळांचा नेतेपदाचा राजीनामा

शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता शिवसेनेचे काही खासदार शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. अशातच शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. आनंदराव अडसूळ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राजीनाम्याचं पत्र पाठवलं आहे.

सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी आनंदराव अडसूळ यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. आनंदराव अडसुळ यांचे चिरंजीव शिवसेनेचे माजी आमदार अभिजीत अडसूळ हे सुद्धा शिंदे गटासोबत आहेत. त्यामुळे आता आनंदराव अडसूळही शिंदे गटाला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करत अनेक आमदारांना आपल्याकडे वळवून घेतले आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेले हे बंड यशस्वी झाले आहे. तसेच त्यांनी विधीमंडळात बहुमताचा विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. परंतु एकनाथ शिंदे यांच्या गटात ११ शिवसेनेचे खासदार सहभागी होणार असल्याची शक्यता आहे. राज्यात शिवसेनेचे १८ खासदार आहेत त्यापैकी ११ खासदार शिंदे गटात सामील होणार असल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.


हेही वाचा : काँग्रेसच्या ‘त्या’ ७ आमदारांवर कारवाई करा, पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी