घरक्राइमकॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याच्या भावाने केली आत्महत्या, 'या' कारणासाठी संपवलं आयुष्य

कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याच्या भावाने केली आत्महत्या, ‘या’ कारणासाठी संपवलं आयुष्य

Subscribe

विशेष म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी परीजनांना 'गूड बाय' असा टेक्स मॅसेज देखील केला होता.

त्रासाला कंटाळून कॉंगेस पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याच्या भावानं आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लातूर शहरातील आदर्श कॉलनी भागात ही घटना घडलीय. स्वतःवर गोळी झाडून त्यांनी आपलं आयुष्य संपवलंय. विशेष म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी परिजनांना ‘गूड बाय’ असा टेक्स मॅसेज देखील केला होता.

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या चुलत भावाने आत्महत्या केलीय. चंद्रशेखर पाटील चाकूरकर असं त्यांचं नाव आहे. ते ८१ वर्षाचे होते. लातूर शहरातील आदर्श कॉलनी भागात ते राहत होते. ते शेती करून आपली उपजिवीका भागवत होते. दररोज सकाळी घराबाहेर फिरायला जाण्याचा त्यांचा नित्यक्रम असायचा. फिरून आल्यानंतर ते स्वताच्या घरी जाण्याऐवजी आधी शिवराज पाटील चाकूरकर यांच्या घरी फेरफटका मारत होते. तिथे चहा पाणी झाल्यावर त्यांच्या घरी पेपर वाचत बसत. बऱ्याच वर्षापासून त्यांचा हा दिनक्रम असायचा. बराच वेळ शिवराज पाटील चाकूरकर यांच्या घरी घालवल्यानंतर मगच ते आपल्या घरी परतायचे. आज सकाळी ते आपल्या चुलत भाऊ शिवराज यांच्या घरी आले. पण नेहमीप्रमाणे आपल्या घरी मात्र ते परतले नाहीत. चुलत शिवराज पाटील चाकूरकर यांच्या घरी त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं.

- Advertisement -

शिवराज चाकूरकर यांच्या त्यांचे चुलत भाऊ चंद्रशेखर पाटील चाकूरकर घरी चहा घेत असताना अचानक गोळी झाडल्याचा आवाज तिथल्या नोकरांना ऐकू आला. आवाज ऐकून घरातील सगळेच जण धावत हॉलमध्ये आले तर तिथे चंद्रशेखर पाटील चाकूरकर हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. तर घटनेची माहिती मिळताच लातूर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामाची प्रक्रिया सुरू केली आहे.

 

- Advertisement -

आत्महत्या करण्यापूर्वी ‘गुड बाय’चा मेसेज

चंद्रशेखर पाटील चाकूरकर हे जेव्हा नेमहीप्रमाणे सकाळी घराबाहेर फिरण्यासाठी निघाले त्यावेळी त्यांनी आपल्या जवळच्या माणसांना एक टेक्स्ट मेसेज केला होता. यात त्यांनी गुड बाय असं लिहिलं होतं. तसंच त्यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर ही गुड बाय असं लिहिलं होतं. चंद्रशेखर पाटील यांच्याकडे बंदुकीचा परवाना देखील होता. त्यांनी याच बंदुकीने स्वतःवर गोळी झाडत ही आत्महत्या केलीय.

 

‘या’ कारणामुळे उचललं टोकाचं पाऊल…

चंद्रशेखर पाटील यांनी इतकं टोकाचं पाऊल नेमकं का उचललं याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण ते गेल्या बऱ्याच दिवसापासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते. चंद्रशेखर चाकूरकर यांची बायपास झालेली होती. अशातच अनेक व्याधी जडल्या होत्या, असं चंद्रशेखर पाटील चाकूरकर याचे चिरंजीव ॲड. लिंगराज पाटील यांनी सांगितलं. त्यामुळे आजारपणाला ते कंटाळून गेले होते. त्यातून हे कृत्य केले असावे, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. त्यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत. सर्वच मुलांची लग्न झाले आहेत. ते सध्या एका मुलाबरोबर शिवराज चाकूरकर यांच्या घराच्या बाजूला असलेल्या फ्लॅटमध्ये राहत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -