वरळीतील ‘हा’ माजी नगरसेवक जाणार बाळासाहेबांच्या शिवसेनेत; आदित्य ठाकरेंना मोठा धक्का

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. विशेष म्हणजे महापालिका निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे गट, भाजपा यांच्यात होणार आहे.

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. विशेष म्हणजे महापालिका निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे गट, भाजपा यांच्यात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने मोर्चेबांधणीला जोरदार सुरूवात केली असून थेट वरळी विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनाच धक्का दिला आहे. ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाने शिंदे गटात प्रवेश केला आहे.

आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील माजी नगरसेवक संतोष खरात यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. आमदार आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातला पहिला नगरसेवक शिंदे यांच्या गटात सामील झाला आहे. संतोष खरात हे वरळीतील वॅार्ड क्रमांक १९५ मधील नगरसेवक होते. (former worli corporator santosh kharat will joins shinde group cm eknath shinde aaditya thackeray)

शिवसेनेचे नेते समाधान सरवणकर, शीतल म्हात्रेंच्या पाठोपाठ आता संतोष खरातही बाळासाहेबांच्या शिवसेनेत सहभागी झाले आहे. विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष टार्गेटवर आला आहे. तब्बल 22 नगरसेवक राष्ट्रावादी पक्षाची साथ सोडणार अशी माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे राष्ट्रवादीचा हा गट वेगळा गट स्थापन करणार अथवा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार अशी शक्यता आहे. या 22 पैकी 6 नगरसेवक लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असून, हे 6 ही नगरसेवक दिग्गज आहे.

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना शह देण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची मोठी खेळी मानली जात आहे. मुंब्रा आणि कळवा येथील अनेक नगरसेवकांसह शेकडो NCP पदाधिकारी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वाटेवर आहे.


हेही वाचा – संजय राऊतांच्या डोळ्याचे ऑपरेशन करावे लागेल; गिरीश महाजानांचा पलटवार