घरमहाराष्ट्रतटकरे विरुद्ध फोरम वादात पालकमंत्र्यांची शिष्टाई

तटकरे विरुद्ध फोरम वादात पालकमंत्र्यांची शिष्टाई

Subscribe

रोहे-अष्टमी सिटिझन फोरमची लवकरच नगरविकास राज्यमंत्र्यांबरोबर बैठक घेण्याचे आश्वासन रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्यानंतर फोरमने बुधवारी आयोजित केलेले आंदोलन तूर्त स्थगित केले आहे. नगर परिषदेचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांच्या विरोधात नियमबाह्य कामकाजाबाबत त्यांच्या गेल्या कार्यकाळात तक्रारी होऊनही बदलीचे सर्व संकेत मोडत नगरविकास मंत्रालयाने त्यांची पुन्हा रोह्यात केलेली बदली, त्यांनी रूजू झाल्यापासून केलेली अनियमित व नियमबाह्य कामे आदी आरोप करीत फोरमने नगरविकास मंत्रालयाची प्रतिकात्मक निषेध अंत्ययात्रा काढण्याचे जाहीर केले होते. याचवेळी खासदार सुनील तटकरे यांनी फोरमच्या या कृतीला आक्षेप घेत राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष समोर येऊन विरोध करतील, असा इशारा दिल्याने फोरम विरुद्ध तटकरे अशी काहीशी तणावपूर्वक परिस्थिती निर्माण झाली.

पालकमंत्री चव्हाण यांनी फोरमच्या पदाधिकार्‍यांकडे संपर्क साधून प्रतिकात्मक अंत्ययात्रा न काढण्याची विनंती केली. त्यांच्यावतीने भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित घाग यांनी फोरमचे अध्यक्ष नितीन परब, निमंत्रक अप्पा देशमुख व इतरांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -