घरCORONA UPDATECoronaVirus: राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा ११२ वरून ११६वर!

CoronaVirus: राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा ११२ वरून ११६वर!

Subscribe

मुंबईत आणखीन चार करोनाचे रुग्ण आढळले.

राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ११२ वरून ११६वर पोहोचली आहे. आज सांगलीतील इस्लापूर येथे एकाच कुटुंबातील पाच सदस्यांना करोनाची लागण झाल्याचे आढळून आहे. तर मुंबईत आणखी चार करोना रुग्ण आढळले आहेत. या चार रुग्णांना प्रवास इतिहास अथवा संसर्गातून करोनाची लागण झाली असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे. तसंच यापैकी १४ बरे होऊन रुग्णालयातून सोडण्याच्या प्रक्रियेमध्ये असल्याचं देखील आरोग्यमंत्री यांनी सांगितलं आहे.

- Advertisement -

सांगलीत कुटुंबातील पाच जणांचा करोना लागण झालेल्यांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि एक लहान मुलीचा समावेश असल्याच समोर आलं आहे. त्यामुळे आतापर्यंत सांगली जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची संख्या ९वर पोहोचली आहे. एकीकडे सांगली जिल्ह्यात करोनाग्रस्तांची संख्या वाढत असली तरी देखील नागरिक मात्र खबरदारी घेताना दिसत नाही आहेत. परंतु पोलिसांनी मात्र पुढाकार घेऊन नागरिकांना अत्यावश्यक वस्तू खरेदी करत असताना सुरक्षित अंतर ठेऊन करण्यास सांगितलं.

आतापर्यंतची राज्यातील करोनाग्रस्तांची आकडेवारी

मुंबई शहर आणि उपनगर – ४५
पिंपरी चिंचवड मनपा – १२
पुणे मनपा – १९
नवी मुंबई – ५
कल्याण – ५
नागपूर – ४
यवतमाळ – ४
सांगली – ९
अहमदनगर – ३
ठाणे – ३
सातारा – २
पनवेल- १
उल्हासनगर – १
औरंगाबाद – १
रत्नागिरी – १
वसई-विरार – १

- Advertisement -

हेही वाचा – या संकटातही काहीतरी सकारात्मक घडतंय – उद्धव ठाकरे!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -