घरमहाराष्ट्रराज्यात चार अपघातात २२ ठार

राज्यात चार अपघातात २२ ठार

Subscribe

सोमवार ठरला घातवार

सोमवार राज्यासाठी घातवार ठरला आहे. सोमवारी राज्यात झालेल्या चार अपघातात एकूण २२ जण मृत्युमुखी पडले आहेत. तर ३० हून अधिकजण जखमी झाले आहेत. मलकापूरजवळ मॅक्झिमो आणि ट्रकचा सोमवारी दुपारी भीषण अपघात झाला. मलकापूर येथून अनुराबाद-झोडगा येथे प्रवासी घेऊन जाणार्‍या महिंद्रा मॅक्झिमो गाडी एका भरधाव ट्रकवर आदळली. त्यामुळे झालेल्या भीषण अपघातात मॅक्झिमो गाडीतील १३ प्रवासी मृत्युमुखी पडले तर ३ जण गंभीर जखमी झाले. जखमींना मलकापूर येथील हॉस्पिटलात दाखल करण्यात आले आहे.

दुसरा अपघात नाशिक रस्त्यावरील कृष्णगाव येथे झाला. भाविकांच्या कारला भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात चारजण जागीच ठार झाले. या अपघातात तीन महिलांसह सहा भाविक गंभीर जखमी झाले आहेत. नाशिक येथे काही भाविक आयशर गाडीने जात होते. मात्र त्यांची गाडी कृष्णगावजवळ बंद पडल्याने ती त्यांनी रस्त्याच्यकडेला पार्क केली होती. त्यावेळी पाठिमागून भरधाव वेगाने आपल्या ट्रकने या कारला धडक दिल्याने हा अपघात झाला.

- Advertisement -

तिसरा अपघात मुंबई-पुणे महामार्गावर खालापूरजवळ सोमवारी सकाळी मिनी बस आणि लक्झरी बसमध्ये धडक झाली. या भीषण अपघातात २ जण ठार झाले, तर २० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. तर चौथ्या अपघातात संगमेश्वरमधील आंबवली येथे सप्तलिंगी नदीच्या डोहात अंघोळीसाठी उतरलेल्या तीन मुंबईकरांचा बुडून मृत्यू झाला. सुट्टीसाठी ते आपल्या गावी आले असताना हा अपघात झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -