Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक शनिशिंगणापूरहून देवदर्शन करुन निघालेल्या पुण्यातील कुटुंबावर काळाचा घाला, ४ जणांचा मृत्यू, ११...

शनिशिंगणापूरहून देवदर्शन करुन निघालेल्या पुण्यातील कुटुंबावर काळाचा घाला, ४ जणांचा मृत्यू, ११ गंभीर जखमी

Subscribe

अहमदनगर शहराच्या कामरगावमध्ये ही धक्कादायक घटना घडली.

बुधवारी सगळीकडे गुढीपाडव्याचा उत्साह सुरू असताना अहमदनगरमध्ये मात्र या उत्साहाला गालबोट लागणारी घटना घडली आहे. नववर्षाची सुरुवात देवदर्शनाने करून आपल्या गावाकडे येत असलेल्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला. या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ११ जणांची प्रकृती गंभीर आहे. या अपघातात निधन झालेले सर्व जण शिरुर तालुक्यातील आमदाबाद गावचे रहिवाशी आहे.

पुणे अहमदनगर महामार्गावर हा भीषण अपघात झाला. अहमदनगर शहराच्या कामरगावमध्ये ही धक्कादायक घटना घडली. शिरूर तालुक्यातील हे कुटुंब नगर जिल्ह्यात शनिशिंगणापूर आणि देवगड इथे देवदर्शनासाठी आले होते. देवदर्शन करून हे कुटुंब आपल्या गावी येत होते. कुटुंबातील एकूण १५ जण हे टेम्पोमधून प्रवास करत होते. नगर-पुणे महामार्गावरील कामगारगाव इथे आले असताना पुण्याकडून येणाऱ्या एका ट्रकने त्यांच्या टेम्पोला जोरदार धडक दिली. यात टेम्पोचालकाचं आपल्या गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि ट्रक टेम्पोवर आदळला.

- Advertisement -

ही धडक इतकी जोरदार होती यात टेम्पोमध्ये असलेल्या चार सदस्यांचा मृत्यू झाला. राजेंद्र साळवे, विजय अवचिते, धीरज मोहिते, मयूर साळवे अशी मृत्यू झालेल्या सदस्यांची नावं आहेत. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरिक आणि नंतर पोलीसही मदतीला धावले. इतर ११ सदस्यांना तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. यात एक बालकही असल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -