Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे चार बळी

राज्यात कोरोनाचे चार बळी

Subscribe

मुंबई: मुंबईसह राज्यात दिवसभरात कोरोना रुग्ण संख्या ३६१ एवढी आढळून आली आहे. यामध्ये मुंबईतील कोरोना बाधित ९६ रुग्णांचा समावेश आहे. तर, दिवसभरात राज्यात कोरोनाचे चार बळी गेले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला कोरोना बाधितांचे मृत्यू रोखण्यासाठी अधिक प्रभाविपणे यंत्रणा राबवावी लागणार आहे.

मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनामुळे एकही रुग्ण दगावलेला नाही. ही काहीशी दिलासा देणारी बाब आहे. मात्र दिवसभरात कोरोनाचे ९६ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबईत आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या ११ लाख ६३ हजार ८६ एवढी झाली आहे. तर आतापर्यंत मुंबईत कोरोना बाधित मृतांची संख्या १९ हजार ७६६ एवढी नोंदविण्यात आली आहे.

- Advertisement -

तसेच, दिवसभरात १३५ रुग्ण हे कोरोना मुक्त झाले आहेत. मुंबईत आतापर्यंत ११ लाख ४२ हजार ६९१ रुग्ण हे कोरोना मुक्त झाले आहेत. सध्या ६२९ सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान, राज्यात दिवसभरात कोरोनाचे ३६१ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८१ लाख ६६ हजार ८६७ एवढी झाली आहे. मात्र दिवसभरात कोरोना बाधित चार रुग्णांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत कोरोनामुले मृत पावलेल्या रुग्णांची संख्या १ लाख ४८ हजार ६३२ एवढी झाली आहे. तसेच, दिवसभरात ७४९ रुग्ण हे कोरोना मुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत ८० लाख १५ हजार ८६० रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. राज्यात सध्या २,४७५ सक्रिय रुग्ण आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -